HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

पवारांच्या साताऱ्यातील बैठकीत शिवेंद्रराजेंची हजेरी, चर्चांना उधाण

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विविध ठिकाणी दौरे करत आहेत. याच पार्श्वभूमीवर, शरद पवार आज (९ ऑगस्ट) सातारच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, यावेळी पवारांच्या उपस्थितीत झालेल्या कराडमधील बैठकीला काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गैरहजर राहिल्याचे वृत्त समोर आले आहे. या बैठकीतील पृथ्वीराज चव्हाणांच्या या गैरहजेरीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण हे सध्या मुंबईत असल्याने या बैठकीला उपस्थित राहू शकले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस नेते एकीकडे अनेक दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा आहेत. दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवारांमधील वाद सर्वांना माहिती आहे. त्यामुळेच राजकीय वर्तुळात चर्चा रंगताना दिसत आहे. त्यातच साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले देखील पवारांच्या या आढावा बैठकीला गैरहजर राहिले असले तरीही आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी मात्र या बैठकीला हजेरी लावली होती. त्यामुळे, आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शरद पवारांच्या उपस्थितीत साताऱ्यात कराडमध्ये यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात एक बैठक झाली. या बैठकीला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण ) शंभूराज देसाई , कोल्हापूरचे पालकमंत्री आणि गृह राज्यमंत्री (शहर) सतेज पाटील यांच्यासह कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मात्र, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या अनुपस्थितीने मोठा चर्चा रंगल्या.

Related posts

तक्रारीनंतर २४ तासांत कंटेट हटवावा लागणार, सोशल मीडियासाठी केंद्राच्या गाईडलाइन्स जारी

News Desk

#CoronaOutbreak | अमेरिकेत कोरोनामुळे २४ तासांत २ हजार जणांचा मृत्यू

News Desk

कुठेही चिखल करुन कमळ फुलवा, आता महाराष्ट्रात होऊ देणार नाही !

News Desk