HW News Marathi
Covid-19

मोठी बातमी ! प्रकाश जावडेकरांनीही दिला केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा

नवी दिल्ली । अवघ्या काही मिनिटांमध्ये मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून त्यापूर्वी मोदी मंत्रिमंडळातील नेत्यांच्या राजीनाम्याचं सत्र सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्यासह अनेक नेत्यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत होती. नुकत्याच हाती आलेल्या नव्या माहितीनुसार, केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांनी देखील आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात अनेक तरुण चेहऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे. त्यातच आता मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेक मोठ्या नेत्यांच्या राजीनाम्याचे सत्र सुरु झाले आहे.

‘या’ मंत्र्यांनी दिला केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा ?

  • रमेश पोखरियाल
  • डॉ. हर्षवर्धन
  • प्रसाद जावडेकर
  • रविशंकर प्रसाद
  • थावरचंद गहलोत
  • बाबुल सुप्रियो
  • संतोष गंगवार
  • रावसाहेब दानवे
  • संजय दोत्रे
  • सदानंद गौडा
  • अश्विनी कुमार चौबे
  • प्रताप चंद्र सारंगी
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिवाळीनंतर राज्यात ९ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरु, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

News Desk

एमबीए-एमएमएस सीईटी परीक्षेचा उद्या निकाल | उच्च व तंत्रशिक्षणमंत्री

News Desk

दिलासादायक ! राज्यात आतापर्यंत ११ लाखांहूनही अधिक रुग्ण ‘कोरोनामुक्त’

News Desk