HW News Marathi
महाराष्ट्र

संघ पद्धतीवर नख लावण्याचं काम केलात तर खपवून घेतलं जाणार नाही भाजपचा इशारा!


मुंबई। राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कालच्या दसरा मेळाव्यात भाषणादरम्यान भाजप आणि केंद्र सरकारवर चांगलाच निशाणा साधला. आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणातील काही मुद्द्यांवरुन भाजपवर निशाणा साधला. त्यांच्या याच टीकेवर आशिष शेलारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.“धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या दिवशीच बाबसाहेबांच्या संविधानावर प्रश्न उपस्थित केला. भाजपवर काहीही बोला पण संघ पद्धतीवर नख लावण्याचं काम केलात तर खपवून घेतलं जाणार नाही”, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला. राज्याच्या प्रमुखांनी सुद्धा अशी भाषा वापरावी याचा आम्ही निषेध करतोय”, असं शेलार म्हणाले.

सकाळी आरएसएसचा जो कार्यक्रम झाला ती विचारांची श्रीमंती होती

मुख्यमंत्र्यांनी दिशा देण्याचे काम केलं पाहिजे. पण त्यांची दिशा चुकल्याने षण्मुखानंद हॉलमध्ये दशावतार सुरु होता. सकाळी आरएसएसचा जो कार्यक्रम झाला ती विचारांची श्रीमंती होती आणि संध्याकाळी जे झालं ते उसनवारी होती. समोर बसलेले शिट्ट्या मारतात की नाही हे बघत होते”, असा टोला शेलारांनी लगावला.

अनेक लोक ठाकरे कुटुंबाकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न करतात

जे लोक म्हणतात की मी पुन्हा येईन, ते कधी येतील मला माहित नाही. सत्तेऐवजी लोक महत्वाचे आहेत, मी तुमच्या कुटुंबाचा भाग आहे, मी टिप्पणी करत नाही , मी तुमच्या साठी बोलतो, अनेक लोक ठाकरे कुटुंबाकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप करणारा कोणीही जन्माला आला नाही. माझे भाषण संपते कधी आणि यांना चिरकायला मिळते कधी याची वाट बघत आहेत. तुम्ही मुख्यमंत्री राहिला असता. विचार एक होते म्हणून भाजपशी युती केली होती. माझ्या जन्म पुन्हा महाराष्ट्र झाला पाहिजे व मला मुख्यमंत्री असल्याचा भास होऊन नये. अहम पणा डोक्यात जाऊ देऊ नको. आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही अंगात ताकद असेल तर उडी, सीबीआय यांना यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काम करता आहात.

मला मोहनजींना सांगायचं आहे

हे काही थोडांत नाही की, मैं तो फकीर हुँ, झोली पहनके, ये झोलीबीली असे कर्मदरिद्री आमचे विचार नाहीयत. हे विचार आमचे नाहीत. सकाळी आरएसएसचा मेळावा झाला. हिंदूत्व ही विचारधारा आपल्या दोघांमध्ये समान आहे. हिंदूत्व म्हणजे काय? मला मोहनजींना सांगायचं आहे की, मी जे बोलणार आहे ते कृपा करुन मी तुमच्यावर टीका केली असं मानू नका. पण तुम्ही जे काही सांगत आहात किंवा मी जे काही सांगतोय ते आपलीच माणसं ऐकत नसतील तर या मेळाव्यांची थेरं करायची तरी कशाला?राजनाथ सिंह कोण म्हणतात की तुम्ही कधी सावरकर आणि गांधीजींना भेटलात का? 1992-1993 येथे दंगल झाली तेव्हा येथे कोण होते. बाबरी मशिदीच्या वेळी सगळे गप्प होते, त्यांची छाती थरथरत होती, शिवसेनाप्रमुखांनी जबाबदारी स्वीकारली आणि अभिमानाने सांगितले आम्ही हिंदू आहोत. आज तोच शिवसैनिक तुमचे शब्द ऐकत नाही (पालखी घेऊन जात नाही) त्यामुळे भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला जातोय, असा सवाल उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री आहे असं कधीच वाटता कामा नये

आपल्या सगळ्यांचे एकत्रित आशीर्वाद घेण्यासाठी हा दिवस असतो. शस्त्रपूजन झाल्यानंतर मी माझ्या खऱ्या शस्त्रांची पुजा केली. आपल्यावर फुलं उधळली. ही माझी खरे शस्त्र आहेत. हे आशीर्वाद घेत अशताना माझ्या मनात नेहमी नम्र भावना असते. प्रत्येक जन्मी हेच आई-वडील, माझा कुटुंब-परिवाह हाच मिळायला पाहिजे. आणि महाराष्ट्रात जन्म व्हावला पाहिजे. आणि मला स्वत:ला मी मुख्यमंत्री आहे, असं कधीच वाटू नये. माझं तर सोडाच तर माझ्या तमाम जनतेला मी मुख्यमंत्री आहे असं कधीच वाटता कामा नये. मी घरातलाच आहे, मी तुमचा भाऊ आहे, असं वाटो, अशी इच्छवर चरणी प्रार्थना आहे. कारण काही जणांना असं वाटतं जे बोलत होते पुन्हा येईल ते बोलत आहेत मी गेलोच नाही. बस आहे तिकडेच. पण जे संस्कार आणि संस्कृती असते ती हीच असते. पदं आणि सत्ता काय आहेत? पदं येतील जातील. पण कधीही अहमपणा कधी डोक्यात येऊ देऊ नको. ज्यादिवशी डोक्यात हवा जाईल, त्यादिवशी तू संपलास, अशी माझ्या वडील आणि आजोबांची शिकवण आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#CoronaVirus : मुंबईची लोकल-बस सेवा बंद करणार नाही,नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा !

swarit

आदित्य ठाकरेंना देशपातळीवर लाँच करून शिवसेनेचा फज्जा उडवला! – गोपीचंद पडळकर

Aprna

राज्य मिळाले आहे ते नीट चालवा! शेळय़ांवर राज्य करणे सोपे असते – सामना

News Desk