HW News Marathi
महाराष्ट्र

सोनू सूद महापालिकेच्या रडारवर, परवानगीशिवाय हॉटेल सुरु केल्याचा ठपका

मुंबई | अभिनेत्री कंगना रानावतनंतर आता अभिनेता सोनू सूद मुंबई महापालिकेच्या निशाण्यावर आहे. कारण बीएमसीने सोनू सूदविरोधात तक्रार दाखल केली आहे. सोनू सूदने जुहूमधील सहा मजली राहिवाशी इमारतीत आवश्यक परवानगीशिवाय अनधिकृत हॉटेल सुरु केल्याचा ठपका बीएमसीने ठेवला आहे. एमआरटीपी कायद्याअंतर्गत सोनू सूदविरोधात तक्रार दाखल करावी, असं बीएमसीने जुहू पोलिसांना सांगितलं आहे. कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊदरम्यान गरिबांना आपल्या घरी पोहोचवण्यासाठी सोनू सूदने अपार मेहनत घेतली होती. गरिबांसाठी तो जणू मसिहाच ठरला होता. परंतु तेव्हा मदतीसाठी चर्चेत असणाऱ्या सोनूची यावेळी मात्र वेगळ्याच कारणांमुळे चर्चा आहे.

बीएमसीने ४ जानेवारीला जुहू पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, “जुहूच्या एबी नायर रस्त्यावर असलेली शक्ती सागर इमारत या रहिवासी इमारतीत कोणत्याही आवश्यक परवानगीशिवाय हॉटेल सुरु केलं आहे. असे निदर्शनास आलं आहे की, सोनू सूद यांनी इमारतीचा काही भाग वाढवल्याचा, बदल केल्याचा आणि वापरात बदल केला आहे. दरम्यान या प्रकरणी सोनू सूदनेही प्रतिक्रिया दिली आहे. “इमारतीमधील बदलासाठी आपण महापालिकेकडे यूझर चेंजसाठी परवानगी घेतली आहे. आता फक्त महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून (एमसीझेडएमए) मंजुरीसाठी थांबलं होतं,” असं सोनू सूदने म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रकांत पाटलांना न्यायालयाचा दणका ! निवडणूक शपथपत्रावरून अडचणीत

News Desk

लतादीदींच्या स्मारकावरून राजकारण, संजय राऊतांनी दिलं उत्तर

News Desk

मुख्यमंत्री शपथविधी सोहळा शिवाजी पार्कात घेण्याची प्रथा बनवू नका !

News Desk