HW News Marathi
महाराष्ट्र

कंगनाच्या ऑफिसवर पालिकेचा हातोडा, तर कंगनाने बीएमसीची तुलना केली बाबराशी 

मुंबई | अभिनेत्री कंगना राणावत हिच्या मुंबईतील कार्यालयावर महापालिकेचा हातोडा पडला आहे. पालिकेने ऑफिसचे टाळे तोडून कारवाईला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर कंगनाने आधी आपल्या ऑफिसला राम मंदिराची उपमा देत बीएमसीची तुलना बाबराशी केली, नंतर तिने थेट पाकिस्तान असे लिहित लोकशाहीची हत्या झाल्याचा घणाघात केला आहे. L

कंगनाने दिलेली उत्तरे आणि कारणे समाधानकारक नाहीत, असे सांगत मुंबई महापालिकेने तिचे वांद्र्याच्या पाली हिल परिसरात असलेले कार्यालय पाडणार असल्याचे स्पष्ट केले होते. पालिका अधिकाऱ्यांनी आज (९ सप्टेंबर) सकाळी ११ वाजताच्या सुमारास टाळे तोडून तिच्या कार्यालयात प्रवेश केला. पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात ही कारवाई सुरु करण्यात आली.

https://twitter.com/KanganaTeam/status/1303569152917946368?s=19

पोलीस आणि महापालिका कर्मचाऱ्यांचे फोटो शेअर करत कंगनाने ‘बाबर आणि त्याचे सैन्य’ असे लिहिले. नंतर कंगनाने थेट पाकिस्तान असे लिहित लोकशाहीची हत्या झाल्याचा घणाघात केला. आधीच पाकव्याप्त काश्मीरशी तुलना केल्याने कंगना अडचणीत आली असताना आता एक पाऊल पुढे जात तिने थेट ‘पाकिस्तान’ म्हटल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

https://twitter.com/KanganaTeam/status/1303572126817857536?s=19

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भर बैठकीत निधीवरून अजित पवार आणि बच्चू कडू यांच्यात वाद

News Desk

नवाब मलिकांच्या ED कोठडीत ७ मार्चपर्यंत वाढ

Aprna

व्यंगचित्र साप्ताहिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्मिकच्या 61 व्या वर्धापन दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा संवाद!

News Desk