HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणेंनंतर आता बीएमसीकडून मोहित कंबोज यांच्या घराची पाहणी

मुंबई | बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यावर करण्यात आलेल्या ड्रग्ज कारवाईनंतर चर्चेत आलेले भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या अडचणीत आजवर वाढ होतानाच पाहायला मिळतं आहे. नुकतंच मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत बांधकाम प्रकरणी नोटीस बजावली आहे. या नोटीसीनुसार आज (बुधवार) कंबोज यांच्या मुंबईतील घराची पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली आहे.

यापूर्वी, मुंबई पालिकेने केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांना जुहू परिसरातील कथित बंगल्यात अनधिकृत फेरबदल केल्याबद्दल नोटीस बजावली होती. तसंच त्यानंतर संबंधित परिसराची पाहणी देखील केली होती. तर आता पालिकेने मुंबईतील सांताक्रूझमधील ‘खुशी प्राइड बेलमोंडो’ इमारतीला नोटीस बजावली आहे. जिथे कंबोज राहतात. पालिकेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही नोटीस एका विशिष्ट फ्लॅटच्या मालकाला नव्हे तर संपूर्ण इमारतीला पाठवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खुशी प्राइड बेलमोंडो या इमारतीमध्ये मोहित कंबोज यांचे एकूण चार फ्लॅट आहेत. या फ्लॅटमध्ये बेकायदा बांधकाम झाल्याची तक्रारी पालिकेच्या एच/पश्चिम कार्यालयात करण्यात आली होती. त्यानुसार, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जवळपास चार तास कंबोज यांच्या घराची तपासणी केली. तसेच या इमारतीचा प्लान, आराखडा इत्यादी बाबतीतील कागदपत्रे तपासण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसेच्या १५ व्या वर्धापदिनानिमित्त राज ठाकरेंनी दिल्या मनसैनिकांना शुभेच्छा!

News Desk

रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी नागपूर ‘आयआयएम’ ही योग्य परिसंस्था ठरेल! – राष्ट्रपती राम नाथ कोविंद

Aprna

अजित पवारांचा एक फोन आणि काँग्रेस आमदारांचे उपोषण मागे…!

News Desk