HW News Marathi
Covid-19

कोरोनाबाधितांची लूट करणाऱ्या मुंबईतील ३७ खाजगी रुग्णालयांना पालिकेचा दणका 

मुंबई | मुंबईत एकीकडे कोरोनास्थिती दिवसेंदिवस गंभीर होत जात असताना दुसरीकडे खाजगी रुग्णालयांकडून मात्र रुग्णांची लूट सुरु आहे. मुंबईतील काही खाजगी रुग्णालयांकडून कोरोनाबाधितांच्या उपचाराच्या नावावर प्रचंड मोठ्या प्रमाणात बिल्स आकारली जात आहेत. गेल्या काही दिवसांत याबाबतच्या अनेक तक्रारी आल्यानंतर आता अखेर मुंबई महानगपालिकेने या परकरणाची गंभीर दखल घेतली आहे. महानगरपालिकेने मुंबईतील तब्बल ३७ खाजगी रुग्णालयांना जबर दणका देण्यात आला आहे. विशेष म्हणजे पालिकेच्या या कारवाईत रुग्णांना तब्बल १ कोटी ४६ लाख ८४ हजारांची परतफेड करण्यात आली आहे. दरम्यान, महानगरपालिकेच्या या कारवाईमुळे निश्चितच रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

खाजगी रुग्णालयांमध्ये राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. कोरोना काळात खाजगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा राज्य सरकारच्या ताब्यात आहेत. त्यामुळे त्यामार्फत उपचार घेणाऱ्या रुग्णांना किती, कसे शुल्क आकारण्यात यावेयाबाबतचे नियम ठरलेले आहेत. त्याच नियमांनुसार रुग्णांना शुल्क आकारले अपेक्षित असताना मुंबईतील खाजगी रुग्णालयांनी मात्र लूट सुरु केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, अनेक तक्रारींनंतर महानगरपालिकेकडून लेखापरीक्षकांची नेमणूक करण्यात आली. यामार्फत आतापर्यंत पालिकेकडून या ३७ खाजगी रुग्णालयांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत रुग्णांना सुमारे १ कोटी ४६ लाख ८४ हजार रुपयांची परतफेड करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘जगण्याचा अधिकार धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारापेक्षा महत्वाचा’ – मद्रास हायकोर्ट

News Desk

राज्यात आज १८,०५६ नवे रुग्ण आढळले

News Desk

‘अ‍ॅस्ट्राझेनेका’ लसीच्या चाचणीला तात्पुरती स्थगिती

News Desk