मुंबई | ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सुरू मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारचे कान टोचले आहे. या प्रकरणाचा तपास संथ गतीने सुरू असलेल्यामुळे न्यायालयाने टीका केले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना या प्रकरणासाठी वेळच नाही, अशा शब्दात न्यायालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसवर टीका केली. कॉ. पानसरे यांच्या हत्येला चार वर्ष पूर्ण झाल्यानंतरही आरोपींचा शोध न लागल्याबद्दल उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.
Bombay High Court raps Maharashtra CM Devendra Fadnavis for slow investigation in Govind Pansare murder case. Court observed that Chief Minister has no time for this case. (file pic) pic.twitter.com/aPoffourZ1
— ANI (@ANI) March 28, 2019
न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढत म्हटले की, शेजारील राज्यात वेगळ्या विचारसरणीचे सरकार आहे. म्हणून तिथे विचारवंतांच्या हत्याकांडाला गांभीर्याने घेतले जाते का? असा सवाल करत कर्नाटकातील गौरी लंकेश प्रकरणातील तपासामुळे महाराष्ट्रातील तपासयंत्रणांना इथे घडलेल्या हत्याकांडांचे धागेदोरे मिळतात. यावर हायकोर्टाने तपासयंत्रणेच्या कार्यक्षमतेवर आणि प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गेली पाच वर्षे एवढ्या संथगतीने तपास सुरू आहे. परंतु, पोलीस याप्रकरणी कोणालाच दोषी ठरवत नाही, याबाबत स्पष्टीकरणही दिले जात नाही. न्यायालयाने लक्ष घातल्यानंतर दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही. समाजात काय संदेश जातोय, याची तुम्हाला जरा तरी कल्पना आहे का, असे खडे बोल खंडपीठाने सुनावले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.