HW News Marathi
महाराष्ट्र

दोन्ही भोसले आमने-सामने

सातारा | साताऱ्यातील जुना मोटार स्टॅन्ड येथे असलेले देशी दारूच्या दुकानवरील सोमवारी भरदुपारी पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडून कारवाई करण्यास सुरुवात झाली. दारूचा अड्डा हटवण्यावरून दोन्ही राजे पुन्हा समोरासमोर आले होते. खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात आमने-सामने वाद झाल्याने त्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी दोन्ही बाजूचे त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात असल्याने वातावरण तंग झाले होते. त्यावेळी पोलिसांनी आदेश दिल्या नंतर दोन्ही राजेंनी माघार घेतली. मात्र या परिस्तिथीमुळे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या लाठीमाराला सामोरे जावे लागले होते.

दरम्यान, पोलिसांनी उदयनराजे, शिवेंद्रराजेंसह त्यांच्या ८० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. खासदार उदयनराजे यांच्यावर दोन तर आमदार शिवेंद्रराजे यांच्यावर एक गुन्हा दाखल झाला आहे. उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, समीर माने, जितेंद्र खानविलकर, किशोर शिंदे, संदीप शिंदे, राहुल गायकवाड, समीर खुटाळे, सूरज अवघडे, केदार राजेशिर्के यांच्यासह ८० दोन्हीबाजूच्या कार्यकर्त्यांना शाहूपुरी पोलिस ठाण्याचे हवालदार धनंजय कुंभार यांनी गुन्हा दाखल केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हो मला ईडीकडून चौकशीची नोटीस आली, खडसेंचा दुजोरा!

News Desk

“शरद पवारांनी खंजीर खूपसल्याचं एक उदाहरण दाखवा, मी राजकारण सोडतो”, संजय राऊत

News Desk

नवरात्र उत्सवासाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी !

News Desk