HW News Marathi
महाराष्ट्र

पिता-पुत्र दोघेही लवकरच जेलमध्ये जाणार; राऊतांचा इशारा

मुंबई | पिता-पुत्र दोघेही लवकरच जेलमध्ये जाणार आहेत, असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि भाजप नगरसेवक आणि किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या यांना दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राऊत-सोमय्या एकमेंकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे. राऊतांनी आज (१८ फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेऊन सोमय्यांवर टीका केली आहे. 

राऊत म्हणाले, “बंगले आणि जमिनी शोधत इकडे तिकडे फिरत आहेत. ते जेलमध्ये जाण्याचा रस्ता शोधत आहेत. जनता लवकर त्यांची धिंड काढतील. वेट अँण्ड वॉच ते कुठे जातात, सोमय्यांच्या स्वप्नात बंगले येत आहे. पण, त्यांनी बंगले कुठे आहेत ते आम्हाला दाखवावे. त्यांच्या स्वप्नात बंगले दिसत आहेत, ते वेडे झाले आहेत. ते जे बेनामी मालमत्ताचा दावा करत आहेत. ते त्यांच्या स्वप्नात दिस आहे.”  

सोमय्या हे ज्यागेचा उल्लेख करतात त्यांचे मालक अन्वय नाईक मालक होते. भाजपच्या नेत्यांनी दबावमुळे त्यांनी नाईकांनी आत्महत्या केली. नाईक हे मराठी माणून, उद्योजकांना भाजप संपवण्याचा काम करत आहेत. नाईकांनी त्यांच्या कामाचे पैसे अर्णब गोस्वामीला पाठविले होते. परंतु, गोस्वामीने ते पैसे दिले नाही आणि भाजपचे लोक गोस्वामींना वाचवण्यासाठी सोमय्यांनी देखील नाईकांना दोनवेळा धमकावले होते. यानंतर नाईकांनी त्यांची आत्महत्या केली. भाजपचे सगळे जण नाईकांचे हत्यारे आहेत, असे राऊतांनी आज माध्यमांशी बोलताना केला आहे. 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनेकदा जेलवारी केलेले गुजरातचे भले ‘मोठे’ गृहस्थ महाराष्ट्रात फिरत आहेत !

News Desk

ओला दुष्काळ घोषित करुन पंचनाम्यांशिवाय मदत जाहीर करा, चंद्रकांत पाटील यांची मागणी

News Desk

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय, आरक्षणाच्या अभ्यासासाठी होणार समिती गठीत!

News Desk