HW News Marathi
देश / विदेश

दोन्ही PA अटकेत, आता अनिल देशमुखांवरही टांगती तलवार

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर काल(२५जूनला) अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी म्हणजेच नागपूरमध्ये ED ने छापे टाकले होते. त्यासोबतच त्यांच्या वरळीच्या निवासस्थानावरही छापेमारी सुरू होती. आता याच प्रकरणात पुढील कारवाई करताना ईडीने दोन जणांना अटक केल्याने अनिल देशमुख यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे या दोघांना ED ने अटक केली आहे. PMLA कायद्यांतर्गत ही करावाई करण्यात आली आहे. तर अनिल देशमुख यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी प्रश्न विचारले असताना संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांनी सहकार्य केलं नाही. यामुळे आर्थिक अफरातफरीच्या प्रकरणात दोघांना चौकशीसाठी अटक केली आहे, अशी माहिती आता ED ने दिली आहे. त्यानंतर मात्र अनिल देशमुख यांच्यावर देखील अटकेची टांगती तलवार आहे.

अंमलबजावणी संचालनालय अर्थात ED ने (२५जूनला) रात्री उशिरा दोघांना बेड्या ठोकल्या. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्याअंतर्गत शिंदे आणि पालांडे यांना अटक करण्यात आली आहे. आज (२६जून) सकाळी ११ वाजताच्या सुमारास न्यायालयात हजर करणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

तर काल (२५जून) ईडीचे अधिकारी आले होते. त्यांना सहकार्य करण्यात आलं. परमबीर सिंह यांना आयुक्त पदावरुन हटविल्यानंतर माझ्यावर खोटे आरोप केले, त्यांनी पोलीस आयुक्त पदाच्या खुर्चीवर बसलेले असताना आरोप का केले नाही, असा सवाल अनिल देशमुख यांनी केला आहे. मुंबईतील १० बार मालकांनी सलग ३ महिने अनिल देशमुख यांना ४ कोटी रूपये दिले असल्याची माहिती ईडीला मिळाली होती. याच पार्श्वभूमीवर ईडीने अनिल देशमुख यांच्या घरी छापा टाकला होता.

सहकार्य करेन !

दरम्यान, परमबीर सिंह यांनी आयुक्त पदाच्या खुर्चीवर होते तेव्हा त्यांनी आरोप का केले नाही, असा प्रश्न देशमुख यांनी उपस्थित करत तपासात सत्य समोर येईलच असा विश्वास व्यक्त केला. तसेच माझ्याकड़ून केंद्रीय तपास यंत्रणाना पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचं देशमुख म्हणाले.

काय आहे प्रकरण ?

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने काल(२५जून) छापे टाकलेत. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान अनिल देशमुख सध्या नागपुरात नसून ते मुंबईत असल्याचं कळतंय. देशमुख यांच्या नागपुरातील जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकले.

अनिल देशमुख यांच्यावर वसुली आदेशाचा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या गुन्हाच्या अनुषंगाने ईसीआयर म्हणजेच दाखल करत ईडीने तपास सुरु केला होता. ईडीने (२५जून) सकाळी पावणे आठच्या सुमारास देशमुखांच्या नागपुरातील घरी छापेमारी केली. यावेळी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सीआरपीएफचे जवान मोठ्या प्रमाणात तैनात आहेत. पाच अधिकाऱ्यांमार्फत हे धाडसत्र सुरु होते.

अनिल देशमुख यांच्यावर वसुली आदेशाचा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या गुन्हाच्या अनुषंगाने ईसीआयर म्हणजेच दाखल करत ईडीने तपास सुरु केला होता. ईडीने काल (२५जून) सकाळी पावणे आठच्या सुमारास देशमुखांच्या नागपुरातील घरी छापेमारी केली. यावेळी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सीआरपीएफचे जवान मोठ्या प्रमाणात तैनात आहेत. पाच अधिकाऱ्यांमार्फत हे धाडसत्र सुरु आहे. सध्या अनिल देशमुख हे घरी नाहीत, त्यांचे कुटुंबीय घरी आहे.

CBI कडून ११ तास चौकशी

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने (२ एप्रिल) रोजी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकून सलग ११ तास चौकशी केली होती. त्यावेळी सीबीआयने अनिल देशमुखांच्या घरातील काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीाआयने गुन्हा दाखल करुन त्यांच्या घरावर छापेही मारण्यात आले होते.

CBI कडून १० ठिकाणी छापे

दरम्यान, CBI ने (२२एप्रिल) रोजी अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह १० ठिकाणी छापे मारले होते. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले असल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं. रात्री उशिरा CBI च्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येतं. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले असून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोवा मच्छिमार खात्याकडून गुजरातीची सक्ती

News Desk

… तर फटाक्यांची माळच लागेल !, मुख्यमंत्र्यांना टार्गेट करत राज ठाकरेंचा इशारा

News Desk

पंतप्रधान मोदींनी रचला इतिहास

Gauri Tilekar