HW News Marathi
महाराष्ट्र

कराडमधील कृष्णा नदीवरील ब्रिटीशनकालीन पूल कोसळला

सातारा | कराड-विटा मार्गावरील कृष्णा नदीवरील जुना ब्रिटीशकालीन पूल कोसळल्याची घटना आज (२९ जुलै) दुपारी साडेचार वाजल्याच्या सुमारास घडली आहे. या पुलाच्या मध्यला भाग पूर्णपणे कोसळले ढासळला आहे. परंतु या पुलावरील वाहतूक गेल्या १५ दिवसांपासून या पुलावरील वाहतूक बंद केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

हा पूल ब्रिटीशकालीन असून जीर्ण झाल्यामुळे या पूलाच्याशेजारी नवीन पूल उभारण्याचे काम सुरू होते. जुना पूल व नवीन पूल याच्या मध्ये आणखी एक नवीन पूल बांधण्याचे काम सुरू आहे. तसेच पूल बांधण्यासाठी सध्या पिलर उभे केले आहेत. पावसामुळे या नवीन पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. दरम्यान, कोसळलेला पूल पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांचे हस्ते २७ जुलैला बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे होणार भूमिपूजन

News Desk

G-२० परिषदेसाठी आलेल्या महिला प्रतिनिधीनी घेतला शहराचा निरोप

Aprna

‘तुमच्या पोकळ धमक्यांना घाबरणारा मी नाही’, भाजपकडून हसन मुश्रीफांना चोख उत्तर

News Desk