HW News Marathi
महाराष्ट्र

साताऱ्यात बस डेपोमधल्या ६ शिवशाही बसेसला लागली आग

सातारा | साताऱ्यात एसटी बस डेपोमध्ये ६ शिवशाही बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. एका तरुणाने पार्क असलेल्या बसला आग लागली. ही आग पसरली आणि शेजारी उभ्या असलेल्या इतर पाच बसेनही पेट घेतला. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान बसला आग लावणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु असल्याची माहिती सुत्रांकडून दिली जात आहे. या घटनेनंतर बस डेपो परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.

या स्टँड परिसरात सहा शिवशाही बस गेल्या काही दिवसांपासून उभ्याच होत्या. या बसेसला आज दुपारी अचानक भीषण आग लागली. या आगीचे धुर लांबपर्यंत दिसत होते. ते पाहून अनेक लोक एसटी स्टँड परिसरात दाखल झाले. संपूर्ण शहरात आगीची बातमी पसरली. अनेकांनी आग पाहण्यासाठी गर्दी केली. याशिवाय त्याठिकाणी प्रवाशांचीदेखील गर्दी होती. प्रशासनाने सुरुवातीला प्रवाशी आणि इतर पाहणाऱ्यांना हटकवून तातडीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केले. प्रशासनाने तातडीने अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही”, पडळकरांची टिका!

News Desk

पारशी नववर्षानिमित्त उपमुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

Aprna

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून औरंगजेबाची कबर ५ दिवस बंद ठेणार! – अजित पवार

Aprna