HW News Marathi
देश / विदेश

…पण राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना वेळ दिली नाही ! अजित पवारांनी केले भाष्य 

मुंबई | राज्यातील महाविकासआघाडी सरकारच्या अडचणीत गेल्या अनेक दिवसांपासून अनेक प्रकरणांमुळे मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, राज्यात घडणाऱ्या या काही घटनांबाबत आज (२५ मार्च) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. यावेळी अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी टाळलेल्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीबाबतही भाष्य केला आहे. “मुख्यमंत्र्यांनी आज महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांसहीत भेटण्यासाठी राज्यपालांकडे वेळ मागितला होता. कामकाजाची माहिती दिली जाणार होती. मात्र राज्यपाल हे सध्या बाहेर असल्याचे कळवण्यात आले आहे. त्यामुळे आता राज्यपाल जेव्हा भेटीची वेळ देतील तेव्हा भेट होईल”, असे अजित पवार म्हणाले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे वेळ का मागितली होती याबाबतही यावेळी अजित पवारांनी माहिती दिली आहे. अजित पवार म्हणजे, “साधारणतः राज्यात अशा काही घटना घडल्या कि मुख्यमंत्री राज्यापालांची भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती देत असतात. तशी पंरपराच आहे”, असे अजित पवार म्हणाले. बुधवारी (२४ मार्च) राज्यातील या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर एक मंत्रिमंडळ बैठक देखील पार पडली. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले कि, “पोलीस दलासंदर्भात करण्यात आलेल्या आरोपांबद्दल मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळाच्या सहकाऱ्यांची भूमिका जाणून घेतली आहे. मुख्यमंत्री या प्रकरणी जो काही निर्णय घेतील त्यामध्ये संपूर्ण मंत्रीमंडळ त्यांच्या पाठीशी असेल.”

जे सत्य आहे ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल !

राज्यातील महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात सध्या भाजपने कंबर कसली आहे. ठाकरे सरकारला अडचणीत आणण्याचे सर्व प्रयत्न भाजप करत आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना अजित पवार म्हणाले कि, “राज्यात जे संभ्रमाचे वातावरण करण्यात आले आहे त्यात कोणालाही पाठिशी घातले जाणार नाहीएनआयए, एटीएस या प्रकरणाची चौकशी करत आहे. जे सत्य आहे ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल. तसेच इतर काही बाबतीत काही चौकशी आवश्यक असेल तर त्याबाबतच्या चौकशींसंदर्भातही आदेश दिले जातील”, असेही आश्वासन यावेळी अजित पवार यांनी दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विजय मल्ल्याचे भारतात येणे लांबणीवर?

News Desk

राज्यराणी एक्स्प्रेसच्या दिशेने अज्ञाताने भिरकावला दगड, मोटरमन जखमी

News Desk

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी कोरोना पॉझिटिव्ह

News Desk