HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरेंनी राज्यपाल व संजय राऊतांची केली नक्कल, म्हणाले…

पुणे | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज सोळावा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने पुण्यात मनसेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणातून त्यांनी महाराष्ट्रातील विविध मुद्यांवर चर्चा केली. तसेच यावेळी राज ठाकरेंनी सत्ताधारी आणि विरोधकांच्या एकमेकांवर सुरू असलेल्या कुरघोडींवरून टोला लगावला आहे. याशिवाय त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांची देखील नक्कल करत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

राज ठाकरेंनी कोविड काळानंतर पहिल्यांदाच भाषण केलं. त्यामुळे त्यांच्या या भाषणाकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. तसेच आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुद्धा ते काय बोलणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. राज ठाकरेंनी निवडणुकांवरून देखील वक्तव्य केले आहे. आता निवडणुका थेट दिवाळीनंतरच होतील, असा दावा त्यांनी केला आहे. “निवडणूक आली की निवडणूक चढायला लागते”, असेही राज ठाकरे म्हणतात.

दरम्यान, यावेळी राज ठाकरेंनी राज्यपाल आणि संजय राऊत यांची देखील नक्कल करत त्यांची खिल्ली उडवली आहे. रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू होते, असं वक्तव्य राज्यपालांनी केले होते. राज्यपालांच्या त्या वक्तव्याचा समाचार घेताना राज ठाकरे म्हणाले, “राज्यपालांना समज आहे की नाही?, आपला काहीही संबंध नसताना उगाच काहीतरी बोलायचं.. शिवाजी महाराजांनी कधीही सांगितलं नाही की रामदास स्वामी हे त्यांचे गुरू होते”, असं ते म्हणाले. तसेच ते पुढे म्हणाले की “ज्यावेळेस मी राज्यपालांना भेटलो होतो, त्यावेळेस मी त्यांना हात मिळवला आणि त्यानंतर मला असं वाटलं की आता हे माझा हात बघून माझं भविष्यच सांगतील”, असा टोलाही त्यांनी राज्यपालांना यावेळी लगावला. यावेळी त्यांनी राज्यपालांची नक्कल देखील केली.

तर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविषयी राज ठाकरे म्हणाले, “संजय राऊत किती बोलतात? कसं बोलतात, पण कसं बोलावं, किती बोलावं हे सुद्धा पहावं”, असं ते म्हणाले. तसेच सध्या टीव्ही लावला की रोज सकाळ सकाळी पहिला संजय राऊत दिसतात, असं म्हणत त्यांनी राऊतांनाही टोला लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औरंगाबाद पदवीधर निवडणूकीत राष्ट्रवादीच्या सतीश चव्हाण यांचा दणदणीत विजय!

News Desk

वाह रे ठाकरे सरकार ! एकीकडे एका बेडवर २-२ रुग्ण, तर दुसरीकडे हजारो बेड्स रिकामी !

News Desk

९०० ई-बसेसमध्ये ३६०० कोटींचा घोटाळा; मिहीर कोटेजा यांचा आदित्य ठाकरेंवर आरोप

Aprna