HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात शिवसेनेचे सरकार स्थापन होईल !

नवी दिल्ली | “डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक लोकप्रिया सरकार स्थापन होईल,” असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. राऊत पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. त्यामुळे काही कायदेशीर बाबीही लक्षात घ्याव्या लागतात. परंतु जेव्हा राज्यपालांकडे आम्ही बहुमताचा आकडा सिद्ध करू त्यावेळी ते आम्हाला सराकर स्थापन करण्यासाठी निमंत्रण देतील. ही एक प्रक्रिया आहे. याआधीही देशात असे झालेले आहे. जेव्हा एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. त्यावेळी सरकार स्थापनेसाठी याच प्रक्रियेतून सर्वांना जावे लागते, अशी माहिती यावेळी राऊतांनी दिली.

राज्यात सरकार स्थापन होण्याविलंब होत असल्याचा प्रश्न पत्रकारांनी राऊतांना दिला. त्यावर उत्तर देताना राऊत म्हणाले की, “प्रत्येक पक्षाची काम करण्याची एक पद्धत असते. शिवसेनेची पद्धत वेगवान आणि गतीमान आहे. आमच्याकडे क्रिया प्रतिक्रिया नसते. आधी बाळासाहेब आदेश द्यायचे आता उद्धव ठाकरे देतात. ते इतर पाळतात. राष्ट्रवादीतही शरद पवार यांचा निर्णय त्यांचा पक्ष पुढे नेतो. काँग्रेसची १०० वर्षांपूर्वीची परंपरा आहे. निर्णय लहान असो की मोठा ते त्याच परंपरेतून निर्णय घेतात. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असाव्यात, असा आमचा अंदाज आहे. आता लवकरच महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या हिताचे शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, सामाजिक न्याय, पायाभूत सुविधा, विकास अशा मुद्द्यावर एक लोकप्रिय सरकार स्थापन होईल,” असा विश्वास राऊतांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवारांची भेट

नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. राज्यात सध्या ओला दुष्काळ आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात फक्त दोनच नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीची पाहणी केली होती. एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि दुसरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अवकाळी पावसामुळे शेतीकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले त्यांची त्यांनी पाहणी केली आहे. पंतप्रधान मोदी आज शरद पवारांची भेट घेऊन राज्यातील शेतकऱ्यांच्या अवस्थेबद्दल सांगून त्यावर चर्चा करणार आहेत, असे राऊत म्हणाले.

 

 

Related posts

सरकारने कांदयाला दिलेले अनुदान शेतकऱ्यांची चेष्टा करणारे !

News Desk

भाजपने ईडीची भीती दाखविल्यानेच शिवसेना युतीसाठी तयार !

News Desk

फोन टॅप होत आहेत, ‘हे’ मला आधीच माहिती होते !

अपर्णा गोतपागर