HW News Marathi
महाराष्ट्र

केज नगरपंचायत निवडणूक कमळाशिवाय होतेय ‘हे’ कुणीतरी अमित शहांपर्यंत पोहचवा! – धनंजय मुंडे

बीड | राज्यातील एकूण लोकसंख्येच्या ३५ टक्के जनतेशी थेट संबंधित असलेले व समाजातील वंचित उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी निर्माण करण्यात आलेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला कमी लेखणे म्हणजे प्रत्यक्ष महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्यासारखे आहे, माजी मंत्री पंकजाताई यांनी माझ्यावर, माझ्या पक्षावर टीका करावी मात्र माझ्याकडे असलेल्या वंचितांना न्याय देणाऱ्या या खात्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करू नये, असे धनंजय मुंडे यांनी केज येथील प्रचार सभेत बोलताना सुनावले आहे.

माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी एका प्रचारसभेत बोलताना सामाजिक न्याय हे 32 नंबरचे खाते असून, या खात्याचा मंत्री लोकांना काही देऊ शकत नसतो, अशा आशयाचे वक्तव्य करत एकप्रकारे सामाजिक न्याय विभागाला कमी लेखले होते, याचाच संदर्भ घेऊन धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.

‘आम्हाला कुणी नाव ठेवत आहे, आमची कुवत काढली जात आहे, आम्ही गरीब माणसं आहोत, पण ज्यांनी पूर्वी 4-4 खाती सांभाळली तरी जनतेने त्यांना 32 हजाराने नाकारले त्यांची कुवत काय असावी; त्यांनी आमची कुवत विचारणे निव्वळ हास्यास्पद आहे, असा खोचक टोला देखील धनंजय मुंडे यांनी लगावला.

केज नगरपंचायत कमळ शिवाय

केज नगर पंचायत निवडणुकीत विरोधी पक्षांची अजब युती असून, इथे भाजप आमदार, भाजप खासदार, राष्ट्रीय नेते असूनही केज नगर पंचायत निवडणुकीत भाजपचा कमळ चिन्ह असलेला एकही उमेदवार रिंगणात नाही, हे महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या पर्यंत कुणीतरी पोहचवा, अशी मिश्किल टिप्पणी धनंजय मुंडे यांनी केली.

आकडेवारी सांगू का?

दरम्यान 32 नंबर वाले 100 कोटी देतो म्हणून घोषणा करत आहेत अशा आशयाची टीका करणा-या माजी मंत्री आणि खासदार ताई अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदत मागायला पुढे का आल्या नाही, असा सवाल उपस्थित केला. तसेच यावेळी त्यांनी अतिवृष्टी अनुदानापोटी जिल्ह्यात मिळालेले 502 कोटी रुपये, सोयाबीन अग्रीम 25% विम्याचे 192 कोटी रुपये तसेच सध्या सुरू असलेल्या खरीप 2021 च्या पीकविमा वाटपाची आकडेवारीच जाहीर सभेत सांगितली.

आम्ही शब्द देतो आणि दिलेला प्रत्येक शब्द पाळतो, केज नगर पंचायतीच्या माध्यमातून ऐतिहासिक असलेल्या केज शहराच्या सर्वांगीण विकासाचा शब्द देतो, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ए.सीचा वापर न करता नैसर्गिक हवा घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

swarit

शिरुर परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – अजित पवार

News Desk

‘जेएनयू’च्या विद्यार्थ्यांवरील जीवघेणा हल्ला, २६/११ची आठवण करून देतो !

News Desk