HW News Marathi
महाराष्ट्र

राजघराणे मराठा समाजासोबत कायमच आहे – शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा | मराठा आरक्षणासाठी सर्व स्तरांतून सरकारवर टीका केली जात आहे. तसेच, सरकारवर दबाव आणण्यासाठी व संघटीत लढा देण्यासाठी ३ ऑक्टोबरला पुण्यात बैठक होणार आहे. या बैठकीत आरक्षणाच्या लढ्याला चांगली व ठोस दिशा मिळेल. राजघराणे मराठा समाजासोबत कायमच आहे. पुण्याच्या बैठकीत जो निर्णय होईल, त्यापध्दतीने आम्ही काम करू, असा विश्वास साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे.

“शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी आज (२५ सप्टेंबर) आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तसेच मराठा समाजाचे विचारमंथन बैठक पुणे येथे तीन ऑक्टोबरला होणार आहे. या बैठकीचे निमंत्रणही त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंना दिले. तसेच याविषयावर चर्चा ही केली आहे.मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय असून यामध्ये कोणत्याही राजकारणाचा हा भाग नाही. मी स्वतः मराठा समाजाचा एक घटक असून या समाजाने आम्हाला मोठे केलेले आहे. त्या या नियोजन बैठकीला मी उपस्थित राहणार आहे. या बैठकीत जो निर्णय होईल, त्यापध्दतीने साताऱ्यातील आम्ही सर्वजण वाटचाल करू”, असे शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डीएसकेच्या मुलाच्या अटकपुर्व जामीन अर्जाला हायकोर्टाचा नकार

News Desk

‘कडक शिस्तीचे प्रशासक’ उपमा देत जयंत पाटलांनी नव्या गृहमंत्र्यांना दिल्या शुभेच्छा

News Desk

आरक्षण गेलं खड्ड्यात! पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विध्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा!

News Desk