नागपूर | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीला आग लागण्याची घटना काल (२ जुलै) घटली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीला लागलेल्या आगीत कोणालाही इजा झाली नाही. नागपूर येथून मूलकडे येत असताना काल सकाळी ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. नागभीड तालुक्यातील मोहाडी येथे गाडीने अचानक पेट घेतला. बोनेट मधून धूर दिसताच गाडीतील सुरक्षा रक्षक खाली उतरले. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही.
राज्यात ईडीच्या माध्यमातून सत्तांतर घडवण्याचा घाट?, देवेंद्र फडणवीस म्हणाले…
विरोधकांकडून ईडीच्या माध्यमातून राज्यात सत्तांतर करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यावर पहिल्यांदाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपात तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त काल (२ जुलै) मूळ गावी मूल येथे आज आले होते. परत जाताना त्यांनी मीडियाशी संवाद साधला. ईडीच्या माध्यमातून राज्यात सत्तांतर घडविले जात आहे, असा आरोप होतोय. त्यात कितपत तथ्य आहे? असा सवाल फडणवीस यांना करण्यात आला. त्यावर ईडीच्या माध्यमातून सत्तांतर घडविण्यात येत असल्याच्या वार्ता केवळ आरोप असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.