HW News Marathi
महाराष्ट्र

‘चलो बारामती’ मोर्चा राजू शेट्टींना पडला महागात, बारामतीत शेट्टींसह ४० जणांवर गुन्हा दाखल

बारामती | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी काल (२७ ऑगस्ट) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीत दुधाच्या भुकटीच्या आयात बंदी आणि दूध दर वाढ दिली जात नसल्याच्या निषेधार्थ राज्य सरकार विरोधात मोर्चा काढला होता. परंतु, मोर्चाला परवानगी नसताना देखील कोरोना काळातील नियमांचे उल्लंघन करत गर्दी जमवल्याच्या आरोपावरुन आज (२८ ऑगस्ट) बारामतीत राजू शेट्टी आणि अन्य ४० जणांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू शेट्टी यांनी काढलेल्या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

परंतु, या मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही. तोंडाला मास्क लावले नव्हते. मोर्चाला परवानगी नाकारली असताना देखील बेकायदा जमाव जमवून घोषणाबाजी आणि भाषणे झाली. त्यामुळे कोरोना काळ असून देखील जमावाच्या आरोग्याला बाधा होईल, असे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यावरुन आज बारामती शहर पोलीस ठाण्यात माजी खासदार राजू शेट्टी आणि त्यांच्या अन्य ४० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विठूरायाला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून चंदनाचा लेप

News Desk

भाजप सरकारला चले जाव सांगण्याची हीच योग्य वेळः खा. अशोक चव्हाण

News Desk

कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट, राज्यात मुसळधार पावसाचा इशारा!

News Desk