HW News Marathi
महाराष्ट्र

विठूरायाला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून चंदनाचा लेप

अभिराज उबाळे

पंढरपूर – उन्हाच्या दाहापासुन होणारा त्रास कमी व्हावा म्हणून आज पासुन श्री विठ्ठल – रुक्मिणीला चंदन उटीचाचा लेप लावण्यास सुरवात झालीय . मृग नक्षत्र निघेपर्यंत दररोज देवाला ही चंदन उटी लावण्यात येते. मार्च महिण्यातच राज्यात उन्हाचा तडाका जाणवू लागलाय .सामान्य माणसाबरोबरच देवालाहि ऋतू मानानुसार त्रास सहन करावाच लागतो . देवाला या उन्हाचा त्रास कमी व्हावा या हेतुने ही पुजा केली जाते . पुजा करण्याची संधी भाविकानां मिळते . या पुजेचे खुप महत्व असून भाविक चंदन उटी पुजेची आवर्जून प्रतिक्षा करतात . श्री विठ्ठलाला चंदन उटीचे शुल्क १५ हजार रुपये तर रुक्मिणी मातेला ७ हजार ५०० आहे . मोठ्या भक्ती भावाने शेकडो भाविक या पुजेचा लाभ घेतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा! – रुपाली चाकणकर

News Desk

उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना लाज वाटली पाहिजे!; वानखेडे प्रकरणावरून सोमय्या संतापले

News Desk

हिंगणघाट जळीत कांड : न्यायालयात पीडितेची बाजू वकील उज्जवल निकम मांडणार

swarit