मुंबई | गणेशोत्सवाच्या काळात ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी मुंबईतील एकूण २०२ मंडळांवर मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. बाप्पाच्या आगमनापासून (१३ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर) विसर्जनापर्यंत या मंडळांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करता आवाजाची मर्यादा न पाळल्यामुळे गुन्हे नोंदविण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
गणेशोत्सव काळात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ६५ ते ७० डेसिबलपेक्षा जास्त आवाज करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ध्वनी प्रदूषण करणआऱ्यावर २०२ मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तसेच पुण्यात डीजे आणि डॉल्बीवर उच्च न्यायालयाने बंदी घातली असातना, देखली काही मंडळांनी गणेश विसर्जनाच्या वेळी डीजे आणि डॉल्बीवर वाजवल्या प्रकरणी पुण्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात ३० मंडळांवर गुन्हा दाखल केला असल्याचे पुण्याचे संयुक्त पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी सांगितले आहे.
About 30 cases have been registered at different police stations for violating the Bombay High Court order on the ban of using DJ/Dolby in Ganesha Mandal Visarjan processions on high volume yesterday: Joint Commissioner of Police Shivaji Bodkhe, Pune #Maharashtra
— ANI (@ANI) September 24, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.