कार्डिलिया क्रुझ प्रकरणी चर्चेत आलेले एनसीबीचे (NCB) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने मोठा दिलासा दिला आहे. समीर वानखेडे हे जन्माने हिंदुच आहेत, ते जन्माने मुस्लिम असल्याचे सिद्ध होत नाही असं म्हणत समितीचा निकाल समीर वानखेडेंच्या बाजूने लागला आहे. राज्याचे माजी अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे आरोप केले होते, त्यानंतर हे प्रकरण जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे गेले होते. आता याप्रकरणी समीर वानखेडेंच्या बाजूने निकाल लागला आहे. अशी बातमी ANI वृत्त संस्थेने दिली आहे.
Caste scrutiny committee gives clean chit to ex-NCB Zonal Director Sameer Wankhede. The order reads that Wankhede wasn’t a Muslim by birth; also states that it’s not proven that Wankhede&his father converted to Islam but it’s proven that they belonged to Mahar -37 Scheduled Caste pic.twitter.com/XcOEcKvB8d
— ANI (@ANI) August 13, 2022
नवाब मलिक यांचे आरोप काय?
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा जन्माचा दाखला ट्विट करत समीर वानखेडे मुस्लीम असल्याचे म्हटले होते. ते मशिदीमध्ये जाऊन भाषण करतात. तसेच ते जन्माने मुस्लीम असून त्यांनी एका अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची जागा बळकावली आहे. त्यांनी खोट्या जात प्रमाणपत्रावर यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करून महसूल विभागात नोकरी मिळविली आहे, असे आरोप मलिकांनी केले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.