HW News Marathi
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे काळाच्या पडद्या आड

मुंबई | ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी गावदेवी येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी आज (३० सप्टेंबर) सकाळी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून विजू खोटे यांची प्रकृती फारशी चांगली नाही. त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. विजू खोटेंनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला.

“सरदार, मैने आपका नमक खाया है,” हा शोले चित्रपटातला विजू खोटेंचा डायलॉग रसिकांच्या कायमस्वरुपी स्मरणात राहिली. याशिवाय अंदाज अपना अपनामध्ये त्यांनी साकारलेली रॉबर्ट ही व्यक्तीरेखादेखील अनेकांना आजही आठवते. अशी ही बनवाबनवी या ब्लॉकबस्टर चित्रपटात त्यांनी बळी नावाचा खलनायक साकारला होता.

१९६८ साली प्रदर्शित झालेल्या ‘अनोखी रात’ या सिनेमात त्यांनी डाकूची भूमिका साकारत अभियनाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. गेल्या ५ दशकांमध्ये ३०० हून जास्त मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी व्यक्तीरेखा साकारल्या. २०१८ साली प्रदर्शित झालेला जाने क्यूँ दे यारो हा त्यांचा अभिनेता म्हणून शेवटचा सिनेमा ठरला.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Vijay Diwas : आज त्यांच्यामुळे देश सुरक्षित – पंतप्रधान

News Desk

“आर्यन खाननं कोणतंही ड्रग्ज घेतलं नाही!”, हायकोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण

News Desk

हा आहे ‘तानाजी’चा फर्स्ट लूक

News Desk