HW News Marathi
राजकारण

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आज मनसेचा पदाधिकारी मेळावा

मुंबई । आगामी विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वच राजकीय पक्ष आपापल्या जोरदार तयारीला लागले आहेत. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणूक लढवणार की नाही याबाबत गेले अनेक दिवस संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आता मनसे विधानसभा निवडवूक लढविणार असून याच पार्श्वभूमीवर मनसेने आज (३० सप्टेंबर) कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळावा आयोजित केला आहे.

मनसेचा हा कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळावा आज सकाळी १०.०० वाजता वांद्रे (पूर्व) येथील एम.आय.जी क्लब येथे पार पडणार आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती देण्यात आली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शुक्रवारी (२७ सप्टेंबर) झालेल्या आपल्या पत्रकार परिषदेत मनसे विधानसभा निवडणूक लढविणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून लवकरच उमेदवारांची नावे देखील जाहीर केली जातील, असे सांगितले होते.

आगामी विधानसभेकरिता मनसेकडून मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि कोकण अशा प्रमुख ठिकाणी उमेदवार उभे केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेच्या संभाव्य उमेदवारांची यादी देखील तयार करण्यात आली आहे. याच दृष्टीने मनसेचा हा मेळावा महत्वाचा ठरतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आपत्तीच्या काळात संपर्क, संवाद ठेवून हानी टाळा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे राज्यातील यंत्रणांना निर्देश

Aprna

महाराष्ट्रातील सत्तांतर घटनापीठाकडे वर्ग; 25 ऑगस्टला होणार पुढील सुनावणी

Aprna

निवडणुकीत कॉंग्रेस करणार कडेकोट बंदोबस्त

News Desk