मुंबई | रमजान व येणारा ईद सण तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य पोलिस दलाच्या मदतीसाठी केंद्राकडे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या(CAPF) वीस कंपन्यांची मागणी करण्यात आली, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाला (CAPF) केंद्र सरकारने मान्यता दिली असून आता राज्यात सीएपीएफच्या २० तुकड्या राज्यात दाखल होणार आहेत.
With several police personnel testing positive for #COVIDー19, long & challenging work hours are leaving Maharashtra police stretched. Ramzan Eid is also on May 25th. To help maintain law & order the state has requested 20 companies of CAPF to be deployed.#MaharashtraGovtCares pic.twitter.com/iJipnxeaQK
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) May 13, 2020
राज्यात लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन होऊ नेय म्हणून पोलीस आहोरात्र आले कर्तव्य बजावत आहे. कर्तव्य बजावताना अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून यात राज्यात आतापर्यंत ८ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. पोलीस दलावर तण येत असल्यामुळे त्यांना अनेक समस्याना सामोरे जावे लागत आहे. यामुळे राज्याचे गृहमंत्री अमित देशमुख यांनी केंद्राकडे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २० कंपन्या मिळाव्यात अशी मागणी केली केली होती.
राज्यात राज्य राखीव पोलीस दलाच्या ३२ कंपन्या कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीने पोलीस दल कार्य करत आहे. मात्र पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांना देखील कोरोनाची बाधा झालेली आहे. पोलिसांना विश्रांतीची गरज आहे.
त्यामुळे राज्यात तातडीने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २० कंपन्या मिळाव्यात अशी मागणी केली असल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.
संबंधित बातम्या
राज्याची केंद्राकडे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २० कंपन्यांची मागणी
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.