HW News Marathi
महाराष्ट्र

शुल्क विभागाचे धाडसत्र सुरू,१३ दिवसात १,४२९ गुन्ह्यांची नोंद

मुंबई | कोरोना विषाणूमुळे २४ मार्च २०२० पासून महाराष्ट्र तसेच संपूर्ण देश पूर्णतः लॉक डाउन झालेला आहे. राज्यातील मद्य विक्रीच्या अनुज्ञप्ती बंद आहेत. राज्यात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री विरुद्ध नियंत्रणात्मक कारवाई करण्याचे तसेच गुन्हे नोंदविण्याचे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिलेले असून गेल्या १३ दिवसात १,४२९ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

राज्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद असून अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक, विक्रीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यस्तरावर निरंतर धाडसत्र सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त श्री कांतीलाल उमाप यांच्या मार्गदर्शनात राज्यव्यापी मोहीम सुरू असून दि.२४ मार्च ते दि.०५ एप्रिल २०२० या कालावधीत खालीलप्रमाणे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

कालावधी नोंदविण्यात आलेले गुन्हे अटक आरोपी जप्त मुद्देमालाची एकूण किंमत
दि.05-04-2020 62 29 रु.8,11,216/-
दि.24-03-2020 ते

दि.05-04-2020

1429 541 रु.3,43,95,458/-

अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्रीविरुद्ध तक्रार स्वीकारण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24 X 7 सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते.

टोल फ्री क्रमांक – १८००८३३३३३३

व्हाट्सअॅप क्रमांक – ८४२२००११३३.

ई-मेल – commstateexcise@gmail.com आहे.

वरील क्रमांकावर अवैध मद्यसंबंधी तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांना बदलले म्हणजे ते गुन्हेगार नाहीत! सेनेनं भाजपला सुनावलं

News Desk

INS विक्रांत प्रकरण ताजं असतानाच किरीट सोमय्यांची ED च्या कार्यालयात धाव; पण कारण काय?

Manasi Devkar

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निकालावरुन अमृता फडणवीसांचे सुचक ट्विट

News Desk