HW News Marathi
महाराष्ट्र

कोटक महिंद्रचे सीईओ यावेळी केवळ १ रुपये पगार घेणार !

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या फैलावाचा परिणाम देशाच्या तिजोरीवर झाल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. अशातच राज्य आणि केंद्र सरकारच्या आमदार, खासदार, यांच्यासह अनेकांच्या वेतनात सरकारने घट केली आहेच. तसेच, कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता कोटक महिंद्र बॅंकेचे सीईओ उदय कोटक हे यावेळी केवळ १ रुपये पगार घेणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. तसेच. त्यांनी पीएम केअर्स फंडाला २५ कोटी रुपयांची मदत केली आहे. उद्य कोटक यांचे बेसिक वेतन २७ लाख आहे.

सीईओंच्या या घोषणेनंतर या च ग्रुपच्या टीमनेही १५ टक्क्यांपर्यंत वेतन कपातीचा निर्णय घेतला आहे. तसेच, २०२१ या वर्षासाठी ही कपात असल्याचे पत्रकही बॅंकेने जारी केले आहे. दरम्यान, बॅंकेकडून त्यांच्या वेतनात स्वत:हून केली जाणारी कपात ही देशाच्या तिजोरीला नक्कीच हातभार लावणारी ठरमार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर डिजिटल महाराष्ट्राचे स्वप्नसुद्धा भाजपचे गाजरच !

News Desk

देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट; राजकीय चर्चा झाल्याची शक्यता

News Desk

राज्य आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

Adil