मुंबई | इयत्ता दहावीचा निकाल नुकताच लागला असून आत पुढे अकरावीच्या प्रवेशासाठी नेमकं काय करायचं हा प्रश्न पालकांना आणि मुलांना होता. तर ११ वी साठी सेट परीक्षा शनिवारी २१ ऑगस्ट रोजी होणार आहे. ही परीक्षा ऑफलाईन असणार आहे. तसंच, परीक्षा देणं ऐच्छिक असणार आहे. CET ची ही परीक्षा ऑफलाईन असणार आहे.
कसं आहे वेळापत्रक?
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. त्यानुसार आता ११ वी प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान ही सीईटी परीक्षा होणार आहे. राज्यभरात एकाच वेळी ही परीक्षा घेतली जाईल, असं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे १०वी परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांनी आता सीईटीसाठी तयारीला लागण्याची गरज आहे.
𝐈𝐦𝐩 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞: CET (optional) for admissions to #FYJC will be held on August 21. The entrance test is to ensure uniformity & comparability in #FYJC #admissions & to ensure fair play for students across all boards. Details of the optional test are given below. #CET #SSC pic.twitter.com/DXHHfyUGqS
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) July 19, 2021
पेपर २ तासांचा असणार असून ११ ते १ या वेळात होणार आहे. एकूण १०० गुणांचा हा पेपर असेल. स्वरूप हे मल्टिपल चॉईस ऑप्शन असणार आहे. एकूण ८ भाषांपैकी एका भाषेतून परीक्षा देता येणार आहे. १० वीच्या अभ्यासक्रमावर आधारित पेपर असणार आहे. यात इंग्रजी २५ गूण, गणित भाग १ आणि २ -२५ गूण असणार आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ आणि २ , २५ गूण आणि सामाजिक शास्त्र अशी विभागणी करण्यात आली आहे. परीक्षेकरता फॉर्म मात्र ऑनलाईन भरावा लागणार आहे. २० ते २६ जुलै दरम्यान ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत देण्यात आली आहे.
दहावीचा निकाल 99.95 टक्के
यंदा इयत्ता दहावीचा निकाल 99.95 टक्के लागला आहे. तर यामध्ये तब्बल 957 विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 टक्के गुण मिळाले आहेत. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी 5 टक्के जास्त विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. तर 83 हजार 962 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. यंदाही कोकण विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे. कोकणात 31 हजार 168 विद्यार्थ्यांपैकी सर्वच विद्यार्थी परीक्षेत पास झाले आहेत. त्यामुळे विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर सर्वाधिक कमी निकाल नागपूर विभागाचा म्हणजे 99.84 टक्के लागला आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल 99.96% असून विद्यार्थ्यांचा निकाल 99.94% आहे. म्हणजेच विद्यार्थीनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा 0.02% ने जास्त आहे.दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 97.84% लागला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.