HW News Marathi
महाराष्ट्र

ईडी म्हटलं की लोक घाबरतात, तुमचा भुजबळ करु असं सांगतात – छगन भुजबळ

नाशिक | राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या, मंत्र्यांच्या मागे ईडी आणि सीबीआयचा सासेमिरा लागला आहे. तर काही मंत्र्यांची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून केली जात आहे. ईडी, सीबीयाच्या प्रकरणावर आता राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे. आज (२ जूलै) कुणावर तरी आरोप, कुणाला तरी नोटिसा असं सुरु असतंय. ईडी म्हटलं की लोक घाबरतात. तुमचा भुजबळ करु असं सांगितलं जातं, ईडीला त्या लोकांकडून उत्तर दिलं जाईल, असं अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नाशिकमध्ये जे काम व्हायला हवं होतं ते झालेलं नाही, असं देखील भुजबळ म्हणाले.

स्मार्ट सिटीसाठी हवा तेवढा विकास झाला नाही

नाशिक शहराचा स्मार्ट सिटीमुळं बोजवारा उडाला असल्याबद्दल विचारलं असता, त्या विषयात अजून लक्ष घातलेलं नाही. मात्र, एकदा पाहायला गेलो होतो. मात्र, स्मार्ट सिटी योजनेमध्ये नाशिकमध्ये जेवढं काम व्हायला पाहिजे होतं तितकं काम झालेलं नाही, असं छगन भुजबळ म्हणाले.

जगातील कुठलिही बससेवा फायद्यात नाही

नाशिक शहरातील महापालिकेच्या स्मार्ट बससेवेला विरोध होता आणि आहे. जगातील कुठलिही बससेवा फायद्यात नाही. मुंबईची बेस्ट सेवा त्याला अपवाद आहे. कारण, बेस्टला वीज पुरवठ्यातून होणारा फायदा बससेवेत घातला जात होता. मात्र, इतर कुठेही बससेवा फायद्यात नाही, असं छगन भुजबळ म्हणाले. नाशिक महापालिकेला हा खर्च परवडणार आहे का हे पाहावं लागेल, असं मत भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे.

स्मार्ट सिटीचे वादग्रस्त सीईओ प्रकाश थविल यांची अखेर उचलबांगडी

नाशिक स्मार्ट सिटीचे सीईओ प्रकाश थविल आणि लोक प्रतिनिधी आणि जनता यांच्यामध्ये संघर्ष होत होता. त्यामुळे नाशिकच्या नगरसेवकांनी प्रकाश थविल यांची बदली करावी अशी मागणी केली होती. राज्याचे सचिव सीतारम कुंटे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत प्रकाश थविल यांची बदली करण्यात आली आहे. आता सुमंत मोरे नाशिक स्मार्ट सिटीचे नवीन सीईओ असतील. नगरसेवकांच्या रेट्या पुढे स्मार्ट सिटी प्रशासन झुकलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विश्वनाथ महाडेश्वर सरांनी माझा विनयभंग केला नाही !

News Desk

स्वतःवर आरोप झाले की सामोरं जायचं नाही हे शूरपणाचे लक्षण नाही! – दिलीप वळसे-पाटील

Aprna

किल्ले शिवनेरीवर तरूणीची आत्महत्या

News Desk