HW News Marathi
Covid-19

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण  

नाशिक | अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. छगन भुजबळ यांनी स्वत: ट्विट करुन याची माहिती दिली आहे. दरम्यान, काल शरद पवार यांच्यासोबत भुजबळांनी लग्नाला हजेरी लावली होती.राष्ट्रवादीच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांचा लग्नसोहळा काल नाशिकमध्ये पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर भुजबळ यांनी हजेरी लावली होती.

‘माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात अलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी.माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.मास्क,सॅनिटायझर चा नियमित वापर करा’, असे ट्विट भुजबळांनी केले आहे.

दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, राज्याच्या काही नेत्यांनाही कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. यात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू यांनाही नुकतीच कोरोनाची लागण झाली आहे. या सर्व नेत्यांनी स्वत: याची माहिती दिली असून लोकांनाही सावध राहण्यास सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलीस बांधवांचा कोरोनाशी लढताना मृत्यू झाल्याचे समजल्याने राज्यपाल व्यथित !

News Desk

देशात कोरोना रूग्ण संख्या परत घटली, बरे होणाऱ्यांची संख्या वाढली

News Desk

#Coronavirus : पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या ११३९ वर

News Desk