HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरेंनी पक्ष म्हणून सर्वसमावेशक, व्यापक भूमिका घ्यावी; प्रवीण दरेकर

मुंबई | भाजप आणि मनसे यांच्या युतीची चर्चा सध्या रंगत आहे. यांच्या युतीबद्दल राजिक्य वर्तुळात पुन्हा चर्चांना वेग आला आहे. अनेक मंत्र्यांनी आता आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून आता भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ‘राज ठाकरे यांनी पक्ष म्हणून व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका घेतली पाहिजे, असा सल्ला दिला आहे. त्यामुळे मनसे-भाजप एकत्र येण्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर पकडला आहे.

भेटीचं नेमकं कारण काय?

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सुद्धा नाशकात आहेत. या दोघांच्या भेटीमुळे आता चर्चांना उधाण आलं आहे. यावर भाष्य करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील हे दोन्ही वरिष्ठ नेते नाशिकमध्ये आहेत. ते एकमेकांना भेटू शकतात’, असं सांगतानाच राज ठाकरे यांनी पक्ष म्हणून व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. आमच्या वरिष्ठ नेत्यांनीही हे मत अनेकदा व्यक्त केलं आहे. पण या संदर्भातील नेमकी माहिती चंद्रकांत पाटीलच देऊ शकतील, असं दरेकर म्हणाले आहेत.

मनसे भाजप युती?

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मनसेसाठी धक्का मानला जात आहे. त्यामुळं आगामी निवडणुकीत शिवसेनेला शह देण्यासाठी मनसे भाजप युती होणार का? या चर्चा रंगताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांना मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेसोबत युती होणार का?, असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी विचारला. त्यावर त्यांनी योग्यवेळी योग्य निर्णय होईल, असे सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भीमा-कोरेगाव हिंसाचार, तपासाची दिशा बदली – प्रकाश आंबेडकर

swarit

संजय राऊतांचं संजय राठोड यांच्या राजीनाम्यासंदर्भात सूचक ट्वीट

News Desk

संजय राऊत उद्या कोणता गौप्यस्फोट करणार?, पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष

Aprna