HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती

मुंबई | महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी अखेर मंगळवारी (१६ जुलै) चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी ही नियुक्ती केली आहे. रावसाहेब दानवे यांनी आपल्या महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केल्यानंतर लगेच चंद्रकांत पाटील यांचे नाव महाराष्ट्र भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात रावसाहेब दानवे पाटील यांना ग्राहक संरक्षण राज्यमंत्रीपद देण्यात आल्यानंतर भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड होणार ? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या. या चर्चांना आता अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘सरकारने ऐकलं नाही तर ‘असहकार आंदोलनाचा ईशारा’, नागपुरात व्यापाऱ्यांनी घेतली फडणवीसांची भेट!

News Desk

सचिन वाझेंचं सहकारी रियाज काझींनाही पोलिस दलातून केले निलंबित

News Desk

‘परमबीर सिंह यांची हायकोर्टात याचिका’, चांदिवाल आयोगाची गरच काय!

News Desk