HW News Marathi
महाराष्ट्र

सचिन वाझेंचं सहकारी रियाज काझींनाही पोलिस दलातून केले निलंबित

मुंबई | मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी NIAच्या कोठडीत असलेल्या सचिन वाझेंचे सहकारी रियाझ काझी यांना मुंबई पोलिस दलातून निलंबित करण्यात आले आहे. या आधी काझी यांची चौकशी NIAकडून करण्यात आली होती. आणि त्यानंतर त्यांना अटक करत पुरावे नष्ट केल्याचा आणि सचिन वाझेंना मदत केल्याचा आरोपही करण्यात आला होता.

रियाझ काझी CIU युनिटमध्ये API होते. मनसुख हिरेन यांची स्कोर्पिओ चोरीचा गेली आणि त्यात अंबानीच्या घराबाहेर गाडी ठेवत त्यात स्फोटके ठेवल्याच आरोप होता. सचिन वाझेंना १३ मार्चला NIAने अटक केली होती.

अंबानी यांच्या घराजवळ एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळून आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरूवातील सचिन वाझे यांच्याकडे सोपवण्यात आला होता.

मात्र, नंतर हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आलं. स्फोटकं प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. यानंतर प्रकरणाला नवीन वळण मिळाले होते. स्फोटकं प्रकरणाचा तपास एनआयएकडून सुरू असताना मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास राज्य सरकारने एटीएसकडे सोपवला होता.

दरम्यान, दोन्ही यंत्रणांकडून तपास सुरू असताना एनआयएने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची चौकशी केली. १३ तास चाललेल्या चौकशीनंतर एनआयएच्या पथकाने सचिन वाझे यांना अटक केली. अटक करण्यात आल्यानंतर वाझेंना एनआयए न्यायालयसमोर हजर करण्यात आलं होतं.

अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ २५ फेब्रुवारीला सापडलेली स्कॉर्पिओ कार तीन वर्षांपासून मनसुख यांच्या ताब्यात होती. या कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या आणि अंबानी कुटुंबाला धमकी देणारे पत्र आढळले. पोलीस यंत्रणांनी जेव्हा मनसुख यांच्याकडे जाब विचारला तेव्हा ही कार १७ फेब्रुवारीला चोरी झाली, त्याची तक्रार विक्रोळी पोलीस ठाण्यात दिली होती असं सांगितलं होतं. यानंतर ५ मार्चला मुंब्रा खाडी, रेतीबंदर येथे मनसुख यांचा मृतदेह सापडला. आदल्या रात्री ते कांदिवलीतील तावडे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याला भेटण्यासाठी घोडबंदरला जातो, असे सांगून घराबाहेर पडले आणि बेपत्ता झाले होते.

मात्र मनसुख आणि अटक आरोपी सचिन वाझे यांच्यात मैत्री होती. मनसुख यांची स्कॉर्पिओ चोरी झालीच नव्हती तर ती वाझे यांच्या ताब्यात होती, वाझे यांनीच ही गाडी अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ उभी केली, असा संशय एनआयएला आहे. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर एनआयएने गुन्हे शाखेचे सात अधिकारी, अंमलदारांची चौकशी केली आहे. त्यात एक सहायक आयुक्त, एक निरीक्षक, दोन सहायक निरीक्षक आणि तीन अमलदारांचा समावेश आहे.

वाझेंची महागडी गाडी जप्त

एनआयएने सोमवारी महागडी दुचाकी जप्त केली. एका महिलेच्या नावे नोंद असलेल्या या दुचाकीचा वापर मुख्य आरोपी सचिन वाझे करीत होते, असा दावा ‘एनआयए’ अधिकाऱ्याने केला. गेल्या वर्षी वाझे यांनी दुचाकीवरून काश्मीर ते कन्याकुमारी असा प्रवास केला होता. त्या सफरीत वाझे यांनी हीच दुचाकी वापरल्याचा संशय आहे. ‘एनआयए’तील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुचाकी दमण येथून जप्त करण्यात आली. या प्रकरणात अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांसह आढळेल्या स्कॉर्पिओसह आठ महागड्या गाड्या ‘एनआयए’ने हस्तगत केल्या आहेत. त्यात वोल्वो गाडीचाही समावेश असून ती दमण येथून जप्त करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकीय भूकंप, अजित पवारांचा उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा

News Desk

राज्यात २० एप्रिलपासून सरकारच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार निवडक उद्योग सुरु होणार

News Desk

गोंदिया, भंडारा घटनेतील सर्व आरोपींवर कडक कारवाई करणार! – उपमुख्यमंत्री

Aprna