HW News Marathi
देश / विदेश

‘ते’ वक्तव्य चुकीचे, आमचा निषेध ! चंद्रकांत पाटलांकडून घरचा आहेर

नवी दिल्ली । कर्नाटक-महाराष्ट्र सीमासंघर्षावरून दोन्ही राज्यात पुन्हा वाद पेटू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडी सरकार आणि कर्नाटक सरकार यांच्यात एकमेकांवर टीका सुरू आहेत. पण त्याचसोबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही कर्नाटक भाजपला घरचा आहेर दिला आहे. “कर्नाटकमधील भाजपचे नेते जे वक्तव्य करत आहेत ते चुकीचे आहे. आम्ही त्याचा निषेध करतो”, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील यापुढे असेही म्हणाले की, “कर्नाटक-महाराष्ट्रातील या सीमासंघर्षाच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना भेटून आम्ही आमचे म्हणणे मांडू. कर्नाटकमधील भाजप नेत्यांकडून केली जाणारी वक्तव्ये चुकीचीच आम्ही त्याचे समर्थन करत नाही. कर्नाटकातील ८४२ गावांमध्ये मराठी भाषिक लोक हे आपल्या भूभागासह महाराष्ट्रात आलेच पाहिजेत”, असेही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी महाविकासआघाडी सरकारवर देखील निशाणा साधला आहे. ” मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन समाजाची दिशाभूल करण्यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरू आहे”, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते सोलापूरमध्ये बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना DCGIची मंजुरी

News Desk

‘हे’ भाजपने ठाकरे सरकारविरोधात रचलेले कुटील षडयंत्र !

News Desk

महाराष्ट्रात आमचा मराठी माणसाचा सीमाभाग लवकरच सामील होईल | जयंत पाटील

News Desk