HW News Marathi
महाराष्ट्र

‘मनसेसोबत युतीसाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागेल’, चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

मुंबई | एकीकडे जिथे भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद सुरु आहेत तिथे दुसरीकडे भाजप आणि मनसेच्या युतीच्या चर्चा रंगात आहेत. मेरे को क्लीप मिली. मैने सुनी, असं सांगतानाच मनसेसोबत युती करण्यासाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागेल, असं मोठं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

केंद्राची परवानगी घ्यावी लागेल

चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकारणात खळबळ माजली होती. पाटलांच्या या विधानामुळे आता अजून राजिक्य वातावरणात वळण येणार असल्याचं दिसून येतंय. राज ठाकरे हे मला आवडणारं राजकीय व्यक्तिमत्त्व आहे. ते बरं बोलत नाहीत तर खरं बोलतात. त्यांनी मला क्लिप पाठवली. ती मी ऐकली आहे. एकदोन दिवसात माझी राज ठाकरेंशी भेट होणार आहे. माझ्या मनातील प्रश्न त्यांच्यासमोर मांडणार आहे, असं सांगतानाच या युतीमुळे देशाच्या राजकारणावर पडसाद उमटणार आहेत. त्यामुळे केंद्राची परवानगी घेणार आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. मनसेसोबत युती करण्यासाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागेल, असं मोठं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

मुझे तो आम से मतलब है

‘मला क्लिप्स मिळाली आहेत मी त्या ऐकेन’ असं चंद्रकांत पाटलांचं म्हणणं आहे. मी ती क्लिप ऐकली आणि माझं म्हणणं मी त्यांच्यासमोर ठेवेन. मुझे तो आम से मतलब है. किससे मिली क्या मतलब? असं सूचक विधान करतानाच मेरे को क्लिप मिली. मैने सुनी. पण युतीबाबतचा मी एकटा निर्णय घेणार नाही. आमची पार्टी या संदर्भात निर्णय घेणार आहे. आता युती ऑन दी स्पॉट होणार नाही. त्यासाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागेल, असं ते म्हणाले आहेत.

वेळ आली तर त्यांचा विचार करू

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेण्यासंदर्भात मोठं भाष्य केलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी त्यांना मनसेला सोबत घेणार का असा प्रश्न विचारला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज ठाकरेंशी चांगले संबंध आहेत. त्यांच्या पूर्वी भेटी झाल्या आहेत. ज्यांची आमची भूमिका पटेल त्यांच्या सोबत जाण्यासाठी हरकत नाही. आम्ही अनेक पक्ष सोबत घेतले आहेत जर ती वेळ आली तर त्यांचा विचार करू, असं विरोधी पक्ष नेते फडणवीस म्हणाले.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औरंगाबादची निवडणुक हिंदुत्त्वाच्या मुद्दयावर लढणार !

swarit

“ओहोटी संपल्यानंतर भरती सुरु होते, वेलकम खडसे साहेब” –  रोहित पवार

News Desk

मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या ६५ वर्षांवरील कलाकारांना आता सेटवर काम करण्याची परवानगी

News Desk