HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटलांची फेरनिवड, लोढांचे मुंबई अध्यक्षपदही कायम

मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. तर मुंबईच्या अध्यक्षपदी मंगलभप्रभात लोढा यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ही घोषणा केली आहे. भाजपच्या प्रदेशाध्यपदाच्या शर्यतीत भाजपचे अनेक नेत्यांची नावे होती. मात्र, या सर्वांना डावलत चंद्रकांत पाटील हे प्रदेशाध्यक्षपदी तर मंगलप्रभात लोढा मुंबई अध्यक्षपदी या दोघांची फेरनिवड करण्यात आली आहे.

यापूर्वी रावसाहेब दानवे यांच्याकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी केंद्रात राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आल्यामुळे राज्यातील प्रदेशाध्यक्ष पद रक्त झाले होते. दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले होते. यानंतर गेल्या अनेक दिवसांच्या सस्पेंन्सनंतर चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्यासोबतच मुंबई भाजप अध्यक्षपदी मंगल प्रभात लोढा यांची वर्णी लागली आहे.  याआधी मुंबई भाजपची जबाबदारी ही आशिष शेलार यांच्याकडे होती. पण त्यांनी राज्यातील मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यामुळे आता त्यांच्याकडे असणारं मुंबई भाजप अध्यक्षपद हे मंगल प्रभात लोढा यांच्याकडे देण्यात आली होती.

 

 

Related posts

राणेंचा मंत्रिमंडळातील क्रमांक कितवा ?

News Desk

द्वेष व हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या भाजप आमदाराच्या फेसबुकवर बंदी !

News Desk

देशाला फसविणाऱ्या लोकांना मोदी सरकार मदत करते!

अपर्णा गोतपागर