HW News Marathi
महाराष्ट्र

मी कुणाचाही बाप काढला नाही – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर | बापाची पेंड हा सहजपणे वापरला जाणारा शब्द आहे. त्या शब्दाचा मी वापर केला. त्यातून कुणाचाही बाप काढायचा नव्हता. मी कुणाचाही बाप काढला नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.आपल्या मराठीत अनेक शब्द सहजपणे वापरले जातात. तुमच्या बापाची पेंड आहे का? असं आपण सहज पणे म्हणतो. पुणे प्रभाग समितीच्या निवडणुकीच्या संदर्भानं आम्हीही बाप आहोत, असं मी म्हणालो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

कुणाचाही बाप काढायचा नव्हता. तसा माझा हेतूही नव्हता. अजित पवारांचाही बाप काढलेला नाही. हा सहज वापरलेला शब्द आहे. हे यांना कळत नाही का? त्यावरून अंगावर येण्याची गरजच काय?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील ?

काही दिवसांपूर्वी पुण्यातच भाजप पदाधिकाऱ्यांच्या एका मेळाव्यात भाषण करताना चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना उद्देशून आम्ही तुमचे बाप आहोत असं म्हटलं होतं. पुणे महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या निवडणुकीवरून चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांच्या बापाचा उल्लेख केला होता. भाजप या स्थगितीच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असून ही स्थगिती उठवली जाईल, असा दावा यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केला.

मात्र ते यावरच थांबले नाहीत तर राज्य सरकारने कृषी विधेयकाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने फतवा काढला आणि बाजार समितीच्या आवाराच्या बाहेर देखील शेतकऱ्यांकडून सेस गोळा केला जाईल असं जाहीर केलं. यांच्या बापाची पेंड आहे का असं.. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आणि पवारांना उद्देशून पुन्हा एकदा बापाचा उल्लेख केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धवजींनी जे केलं ते शरद पवार यांनाही मुंडे प्रकरणात करता आलं असतं – चंद्रकांत पाटील

News Desk

शेजारी-शेजारी खुर्ची, तरीही राणे-ठाकरेंनी एकमेकांकडे पाहिलं नाही!

News Desk

भाजपाच्या कार्यकारिणीत अजित पवारांच्या चौकशीच्या ठरावावरुन संजय राऊत संतापले, म्हणाले…

News Desk