HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

तुम्हाला जनतेला शॉक द्यायची सवय आहे मात्र, जनता लवकरच तुम्हाला शॉक देईल – चंद्रकांत पाटील 

मुंबई | राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत तुम्हाला जनतेला  ‘शॉक ‘ द्यायची तुम्हाला सवय आहे, मात्र जनता लवकरच तुम्हाला ‘शॉक’ देईल. जनता सर्वकाही बघतेय हे लक्षात ठेवा’ अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नितीन राऊत यांच्यावर टीका केली आहे. यासंबंधी चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरवर एक ट्वीट केले असून त्यातून सरकारवर टीका केली आहे.

 

गेल्या काही दिवसांत वीज बिल वाढलं असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या. पण वीज बिलात वाढ झाली नाही असं भाष्य नितीन राऊत यांनी केलं होतं. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी ट्वीटरद्वारे उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, ‘एक बातमी वाचली की राज्याचे ऊर्जा मंत्री म्हणत आहेत ” वीज बिलं वाढलेली नाही , लोकांचा तसा समज झाला आहे.” हे वाचून महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी अत्यंत वाईट वाटले. हे जोडून तोडून तयार झालेले तिघाडी सरकार संपूर्णपणे नागरिकांप्रती असलेली आपली जबाबदारी विसरली आहे. ‘

 

‘मंत्री मोहोदय, मी आपल्याला परत सांगू इच्छितो की ग्राहकांना ‘शॉक’ देणं बंद करा. जनतेने मोदी जी यांच्यावर विश्वास ठेऊन काँग्रेस आणि राहुल गांधींना जो शॉक दिला आहे तो विसरू नका. येत्या काळात तो तुम्हाला परत महाराष्ट्रात नक्कीच अनुभवायला मिळेल. जनता सर्वकाही बघते हे लक्षात ठेवा, असेही त्यांनी म्हटले आहे.

Related posts

येत्या २१ जूनला पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार

News Desk

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींच्या ९ सभा

News Desk

उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था खालावली, प्रियंका गांधींचा योगींना टोला

News Desk