HW News Marathi
महाराष्ट्र

‘सामना’च्या अग्रलेखातील गलिच्छ भाषेबाबत चंद्रकांत पाटील रश्मी वहिनींना पत्र लिहिणार

पुणे | शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत आपल्या लिखाणातून कायम टिका करत असतात. यावरुन आता चंद्रकांत पाटील आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. ‘सामना’मध्ये माझ्याविरोधात गलिच्छ भाषेत लिखाण केले. त्यामुळे सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार आहे, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना आलेल्या ईडी नोटिसीविषयी लिहिताना अग्रलेखात आपल्याविषयी वापरलेली भाषा अशोभनीय असल्याची तक्रार चंद्रकांतदादांनी केली आहे. ‘डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य’ अशा शब्दात चंद्रकांत पाटलांवर ‘सामना’तून बोचरी टीका करण्यात आली होती.

“शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’मध्ये माझ्याविरोधात गलिच्छ भाषेत लिखाण केले. संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस होती, त्यावेळी त्यांची भाषा शोभनीय नव्हती. मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे सामनाच्या संपादक आहेत. संपादक म्हणून ही त्यांची भाषा असू शकत नाही, मग अग्रलेखात ती कशी? त्यामुळे त्यांना मी पत्र लिहिणार आहे” असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी रश्मी ठाकरेंना पत्र लिहिल्यानंतर यावर राऊत कशा भाषेत उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

पुढे पाटील असंही म्हणाले की, “ज्यावेळी हे गोधड्या भिजवत होते तेव्हा बाळासाहेबांनी मागणी केली होती असं ते म्हणाले होते. चांगलं आहे, मग बाळासाबेबांनी केलेली मागणी धरुन धरा. हा काँग्रेस आणि शिवसेनेतील वाद असून आम्हाला यात पडायचं नाही. नवीन वर्षात अध्यक्ष म्हणून खूप प्रवास करुन संघटन मजबूत करण्याचा माझा संकल्प आहे. १४ हजार ग्रांमपंचायत निवडणुका १५ जानेवारीला आहेत. त्या अधिकाधिक जिंकाव्यात यासाठी प्रयत्न आहे. याशिवाय २०२२ साली मुंबईसह पालिका निवडणुका लढवणे, जिंकणे हादेखील संकल्प आहे. तसंच त्यातही मुंबईवर दिल्लीचंही लक्ष राहील. मुंबईच्या पायाभूत समस्यांकडे दुर्लक्ष करणं आणि पैसे गोळा करणं एवढंच लक्ष राहिलं आहे,” अशी टीका यावेळी त्यांनी केली आहे.

काय लिहिले होते अग्रलेखात?

‘ईडी’ च्या बाबतीत ज्यांना ‘घटना’ आठवते त्यांनी राज्यपालनियुक्त जागांबाबतही घटनेचे स्मरण ठेवले पाहिजे, असा टोला सामनाच्या अग्रलेखातून चंद्रकांत पाटील यांना लगावण्यात आला होता. ‘ईडी’ वगैरेचा वापर करुन महाराष्ट्रातील सरकार पाडता येईल, या अंधश्रद्धेतून आता बाहेर पडले पाहिजे, असंही राऊतांनी म्हटलं. डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य, अशा शब्दात राऊत भाजपवर बरसले.

‘चंद्रकांत पाटलांना घटनेची इतकी फिकीर कधीपासून लागून राहिली? तुम्हाला घटना मान्य नाही काय, हा प्रश्न त्यांनी राजभवनाच्या दारात उभे राहून जोरात विचारायला हवा. घटनेची सगळ्यात जास्त पायमल्ली सध्या कुठे होत असेल तर ती घटनेच्या तथाकथित रखवालदाराकडून. मागच्या जून महिन्यात राज्यपालनियुक्त १२ जागा रिकाम्या झाल्या. त्या जागांची शिफारस राज्याच्या मंत्रिमंडळाने केली. राज्य मंत्रिमंडळाच्या शिफारशी मान्य करणे हे राज्यपालांना बंधनकारक असल्याचे आपली घटनाच सांगते. मग इतके महिने उलटून गेले तरी राज्यपालनियुक्त जागा रिकाम्या का ठेवल्या?, असा सवालही राऊत यांनी विचारला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अभिनेत्री कंगना राणावत मुंबईत दाखल

News Desk

३१ डिसेंबर निमित्त आयोजित कार्यक्रम व नववर्षाचे स्वागत कार्यक्रमांसंदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

Aprna

राजकीय पक्षांनी संपर्काचा तपशील त्वरित सादर करावा; राज्य निवडणूक आयोगाचे आवाहन

News Desk