HW News Marathi
Covid-19

चंद्रकांत पाटील तुम्ही कोल्हापुरातून निवडणुकीसाठी उभे राहाच…! राष्ट्रवादीचे आव्हान

मुंबई | “कोल्हापूरमधील आमदाराचा राजीनामा घेऊन भाजपने त्या जागेवर चंद्रकांत पाटलांना उभे करावे. निवडणुकीत चंद्रकांत पाटलांचे डिपॉझिट करण्याची ताकद आमच्यात आहे”, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे. “माझं चॅलेंज आहे. कोल्हापूर विधानसभेची पोट निवडणूक घ्यावी. जर मी निवडून नाही आलो तर राजकारण सोडून देईन आणि हिमालयात जाईन”, असे आव्हान काल (२ नोव्हेंबर) चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात एका कार्यक्रमात दिले होते.

मंत्री नवाब मलिक यांच्यासह काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी देखील चंद्रकांत पाटील यांच्या या दाव्यावरून टोला लगावला आहे. “चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय २०१९ सालीच घ्यायला हवा होता. आता ती संधी निघून गेली आहे”, असे सतेज पाटील म्हणाले. “चंद्रकांत पाटील कोल्हापुरातील मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याची भाषा करतात. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नाही. मग तुम्ही कोणाला राजीनामा द्यायला लावणार ?”, असा सवालही यावेळी सतेज पाटील यांनी उपस्थित केला.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील ?

चंद्रकांत पाटील म्हणाले कि, “जे मला म्हणतात कि मी कोल्हापूरमधून पळून आलो. मी तिथे निवडून आलो नसतो. मी पुणे हा सुरक्षित मतदारसंघ आहे म्हणून नव्हे, तर पक्षाकडून आदेश आल्यामुळे निवडणूक लढवली होती. मात्र मी आज मी एक चॅलेंज देतो की, कोल्हापूरमधील कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून आज एखाद्याने राजीनामा द्यावा आणि पोटनिवडणूक घ्यावी म्हणजे त्यांना समजेल. मी जर तिथून निवडून आलो नाही तर राजकारण सोडून देईन आणि हिमालयात जाईन.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज १२ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित तर ३०२ मृत्यू

News Desk

कोरोनाने वाचलो अन् महागाईने मेलो…राज्यभर राष्ट्रवादीच्या महिलांचे आंदोलन!

News Desk

रेमडेसिवीरची प्रचंड टंचाई आणि काळाबाजार, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

News Desk