HW News Marathi
महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांना न्यायालयाचा दणका ! निवडणूक शपथपत्रावरून अडचणीत

पुणे | पुणे न्यायालयाने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठा धक्का दिला आहे. निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्या प्रकरणी आता चंद्रकांत पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणी चौकशी करून येत्या १५ सप्टेंबरपर्यंत सर्व माहिती न्यायालयात सादर करण्याचे आदेश पुणे न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी आपल्या विरोधातही हा आरोप केवळ राजकीय सूडबुद्धीने असून पूर्णपणे तथ्यहीन असल्याचा दावा केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करत अभिषेक हरिदास यांनी पुणे न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी याबाबतच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. “आपल्याविरोधातील हे आरोप संपूर्णतः राजकीय सूडबुद्धीने केलेले असून ते पूर्णपणे तथ्यहीन आहेत”, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील ?

“माध्यमांमधून असे समजले कि, माझ्या विरुद्ध न्यायालयात एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, अद्याप मला न्यायालयीन आदेशाची नोटीस प्रत मिळालेली नाही. त्यामुळे, मी त्याबद्दल काही भाष्य करणार नाही. ही तक्रार संपूर्णतः राजकीय सूडबुद्धीने केलेली आहे. त्यामुळे ती तथ्यहीन आहे. अर्ज भरण्याच्यावेळी छाननी करताना आक्षेप नोंदवण्याचा अधिकार असतो. मी निवडणूक अर्ज भरताना आवश्यक ती सर्व माहिती दिलेली आहे. तरीही कोणाला आक्षेप असेल तर त्याने उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करु शकतो”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओबीसी आरक्षणासाठी जूनमध्ये बांठिया समितीचा अहवाल मांडणार! – अजित पवार

Aprna

“मंद बुद्धी, बहु गर्वी, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा?” अमृता फडणवीसांचा राज्य सरकारला टोमणा

News Desk

“स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर कशासाठी? सत्तेसाठी आणि पदासाठी ही लाचारी”, नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यावर प्रहार  

News Desk