HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांनी स्वतःच्या स्वार्थासाठी उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री केले, चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

पंढरपूर | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे. दिग्गज नेते आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत. आज (१४ एप्रिल) चंद्रकांत पाटील भाजपचे उमदेवार समाधान आवाताडे यांचा प्रचार करण्यासाठी पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्याची कल्पनाच नाही. मुख्यमंत्र्यांनी पीपीई किट घालून फिरावं म्हणजे त्यांना वास्तवाची जाणीव होईल, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

पुढे ते असं देखील म्हणाले की, सध्याचे मुख्यमंत्री फक्त एका पक्षाचेच प्रमुख असल्यासारखे वागतात. शरद पवार साहेबांनी त्यांच्या स्वार्थासाठी त्यांना मुख्यमंत्री बनविले व स्वत: सरकारच्या बाहेर राहिले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत. कदाचित म्हणूनच त्यांनी ऑक्सिजन हे विमानाने आणण्याबाबत काल भाष्य केले, असं सांगतानाच महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजन निर्मितीची व्यवस्था सरकारला करावी लागेल. ऑक्सिजन असो वा रेमडेसिवीर इंजेक्शन किंवा व्हेंटिलेटर असू दे जोपर्यंत मुख्यमंत्री स्वत: पीपीई किट घालून बाहेर फिरत नाहीत तोपर्यंत नेमके काय सुरु आहे हे मुख्यमंत्र्यांना कळणार नाही, असंही ते म्हणाले आहेत.

तसेच, पुढे ते म्हणाले की, मुंबईची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था ढासळलेली आहे. आम्हाला या लॉकडाऊनमध्ये कुठेही राजकारण करायचे नाही. आम्ही या लॉकडाऊनमध्ये सरकारला पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत. पण आता मुख्यमंत्र्यांनी राज्याचा दौरा केल्यास त्यांनाही राज्यातील भीषण स्थिती समजू शकेल, त्यामुळे त्यांनी राज्यात फिरावे व राज्यातील विदारक स्थिती समजावून घ्यावी, अशी विनंती आम्ही त्यांना करीत आहोत, असे पाटील म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार – मुख्यमंत्री 

News Desk

राज ठाकरें पाठोपाठ देवेंद्र फडणवीसही जाणार अयोध्येला…!

News Desk

केंद्र व राज्याच्या वादात आम्हाला पडायचं नाही – राजू शेट्टी

News Desk