HW News Marathi
महाराष्ट्र

“विधानपरिषदेच्या ६ जागा आम्ही जिंकूच,  पुण्याची जागा तर वनवे”, चंद्रकांत पाटलांचा विश्वास

कोल्हापूर | राज्यातील ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार विधान परिषदेच्या जागेसाठी मतदान पार पडत आहे. अनेक नेत्यांनीही आपला मतदानाचा हक्क आज (१ डिसेंबर) बजावला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही कोल्हापूरात आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी या ६ जागाही आम्हीच जिंकणार असा दावा केला आहे. या जागांवर चुरस आहे पण विजयाची खात्री असल्याचा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. इतकच नाही तर पुण्याची जागा तर वनवे असल्याचंही पाटील म्हणाले आहेत.

पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानासाठी चंद्रकांत पाटील कोल्हापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. ‘पुणे पदवीधर मतदारसंघात आपण दोन वेळा आमदार झालो आहोत. तेव्हा उमेदवार स्ट्रॉंग होते. आता तर उमेदवार विक आहे. अरुण लाड यांना घरचा रस्ता दाखवण्याचाच हा मार्ग आहे’, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

पदवीधरचा आमदार असताना आपण केलेल्या कामाची यादी मोठी असल्याचा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. विरोधकांना मुद्दाच नाही. झोपलेल्याला उठवता येतं पण झोपेचं सोंग घेणाऱ्याला उठवता येत नसल्याची टीका पाटील यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. पुणे पदवीधर हा ३६ वर्षे आमचा गड राहिला आहे. आताही तो कामय राहिल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पाटलांचा विश्वास कायम राहणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ताईसाहेब,मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिण्यापेक्षा मोदींना लिहा,धनंजय मुंडेंचा पंकजांवर निशाणा !

News Desk

सत्ता ही कुणाच्या बापाची जहागीरदारी नाही, वडेट्टीवारांचा नारायण राणेंना टोला!

News Desk

गोपीचंद पडळकरांकडून बैलगाडी शर्यतीचे होणार आयोजन…!

News Desk