HW News Marathi
Covid-19

सोलापूरमध्ये ‘चेस द व्हायरस’ प्रभावीपणे राबवा!

सोलापूर | सोलापुरात दिवसेंदिवस कोरोनाबधितांची संख्या वाढत आहे. सोलापुरातील ही वाढती रुग्णसंख्या पाहता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी २६ जुलैपर्यंत १० दिवस हा लॉकडाऊन लागू केला आहे. सोलापूर शहर आणि आजूबाजूच्या तालुक्यातील जवळपास ३१ गावांमध्ये हा लॉकडाऊन लागू असेल. या दरम्यान दूध, मेडिकल, रुग्णालय या व्यतिरिक्त सर्व आस्थापना बंद असणार आहेत. अनलॉकच्या कालावधीत ज्या बाजारपेठा सुरू करण्यात आलेल्या होत्या. त्या सर्व बाजारपेठा १० दिवस बंद असणार आहेत.

सोलापुरातील कोरोना आटोक्यात येण्यासाठी सर्व ते प्रयत्न करावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. ‘सोलापूरमध्ये ‘चेस द व्हायरस’ प्रभावीपणे राबवा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत’. तसेच, ‘सोलापुरातील आरोग्य सुविधा तातडीने वाढवण्यावर भर द्या’, असे निर्देश देखील त्यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना मनसेचा इशारा

News Desk

पुणे महानगरपालिकेचा ‘व्हॅक्सीन ऑन व्हिल्स’ उपक्रम

News Desk

रेमडीसिव्हीर इंजेक्शन रुग्णालयातून गायब झाल्याने त्याच्या चौकशीची गृहराज्यमंत्री शंभूराज यांची मागणी

News Desk