HW News Marathi
महाराष्ट्र

अभिनेत्री सविता मालपेकर हाती घेणार राष्ट्रवादीचा झेंडा!

पुणे | अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर आता आणखी एक अभिनेत्री राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. अभिनेत्री सविता मालपेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत.सविता मालपेकर यांच्यासोबत गीतकार आणि अभिनेते बाबा सौदागर, प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना नेवरेकरही राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणार आहेत.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता मराठी कलाकार देखील राजकीय वर्तुळात प्रवेश करताना दिसत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडणे शरमेची बाब सुधीर मुनगंटीवारांचे टीकास्त्र!

News Desk

“आमची अजित पवारांशी ७२ तासांची मैत्री आजही कायम…”, मुनगंटीवारांचे सूचक वक्तव्य  

News Desk

कोंकण विभागात एस.टी. सेवा पूर्ववत; 4 हजार 910 पेक्षा अधिक कर्मचारी कामावर हजर

Aprna