HW News Marathi
महाराष्ट्र

‘तो शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार’, छगन भुजबळांचं किरीट सोमय्यांना प्रत्युत्तर

मुंबई। कथित महाराष्ट्र सदन प्रकरणात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यावर समाज सेविका अंजली दमानिया यांनी कोर्टाच्या या निर्णयाविरुद्ध कोर्टात जाणार असल्याचं सांगितलं आहे. त्यालाच आता छगन भुजबळ यांनी साडेत्तोड उत्तर दिलं आहे. त्याचबरोबर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे.

तो शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार

पुन्हा निवडणुका येतील, त्यात लोकांच्या प्रश्नावर पुन्हा आवाज उठविण्यात येईल. जनताही आता सारे काही जाणून असून, नोटाबंदी, नोकऱ्यांचे खोटे आश्वासन, जीएसटीतून पिळवणूक, अशा साऱ्या प्रश्नांवर जनता उघडपणे काही बोलत नसली तरी, मतपेटीतून ती निश्चित बोलेल, असे सांगून राजकीय व्यासपीठावर जे मला योग्य वाटेल ते बोलेलच, त्यासाठी कोणाची पर्वा करणार नाही, असा इशाराही भुजबळ यांनी दिला. किरीट सोमय्या यांनी नाशकात येऊन केलेल्या पाहणीतून काहीच निष्पन्न झाले नाही. तो शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार होता, अशा शब्दांत टीका केली.

यांनी खुशाल हायकोर्टात जावं

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मुंबईतील सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. भुजबळ यांना न्यायालयाकडून क्लीन चीट मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपण याप्रकरणी हायकोर्टात जाऊ, असा इशारा दिला आहे. त्यांच्या याच भूमिकेवर भुजबळ यांना प्रश्न विचारला असता त्यांनी दमानिया यांनी खुशाल हायकोर्टात जावं, असं भुजबळांकडून सांगण्यात आले.

“मेरे खिलाफ होनेवाली बातो को मैं अक्सर खमोशी से सूनता हुँ…

राजकारणात शब्दाने शब्दाला उत्तर दिलं जातं आणि विचाराने विचाराला. परंतु, हल्लीच्या काळाज अडचणीत टाकण्याचा प्रकार सुरू झाला आहे. आता तर अधिकच अडचणीत टाकलं. त्यातूनच बाहेर वाकप्रचार सुरू झाला तुम्ही सरळ वागता की तुमचा भुजबळ करू. आता त्यांना तो वाकप्रचार वापरता येणार नाही. दुसरं काही तरी शोधावं लागेल, असा चिमटा त्यांनी काढला.“लोकशाही आहे, त्यांनी खुशाल हायकोर्टात जावं. आम्ही अधिक उजळ माथ्याने समोर येऊ”, असं छगन भुजबळ यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी हिंदीतला एक शेरही म्हटला. “मेरे खिलाफ होनेवाली बातो को मैं अक्सर खमोशी से सूनता हुँ, जवाब देने का हक मैने वक्त को दे रखा है”, अशा शब्दात भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकारणातील मोठी बातमी ! राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट

News Desk

शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी केतकी चितळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Aprna

भाजप-मनसे युतीचा नारळ फुटला, राज्यातील पहिली युती जाहीर!

News Desk