HW News Marathi
महाराष्ट्र

छगन भुजबळ पुन्हा दिल्ली दौऱ्यावर OBC आरक्षणासाठी घेणार महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी!

नवी दिल्ली। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीबाबत ते दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. यावेळीही ते ओबीसी आरक्षणासाठी महत्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. एकाच आठवड्यात ओबीसी आरक्षणासाठी भुजबळ दुसऱ्यांदा दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत.भुजबळ ओबीसी महासंघाच्या कार्यक्रमालाही हजेरी लावणार आहेत. छगन भुजबळांच्या हस्ते शरद यादव यांचादेखील सत्कार होणार आहे. सोबतच ते लालू प्रसाद यादव यांची देखील भेट घेणार आहेत. रविवारी समता परिषदेची दिल्लीत बैठक होणार आहे.

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे शुक्रवारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे यावर सर्वपक्षांचे एकमत झाले आहे. बैठकीत प्राप्त सूचना आणि पर्यायांचा येत्या काही दिवसांमध्ये अभ्यास करून पुढील शुक्रवारी यासंबंधाने सर्व सहमतीने निर्णय घेऊ, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिली . विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व नेत्यांनी आरक्षण टिकवून ठेवण्यासाठीचे पर्याय, सूचना यासंबंधातील आपली मतेही या बैठकीत मांडली.

या बैठकीला अजित पवार, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार, अॅड.अनिल परब, प्रवीण दरेकर, देवेंद्र फडणवीस, कपिल पाटील, देवेंद्र भुयार यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वसतिगृह, सांस्कृतिक भवनाची कामे तात्काळ पूर्ण न झाल्यास कारवाई! – मंत्री धनंजय मुंडे

News Desk

‘आमदार निलेश लंकेंनी अरेरावी, शिवीगाळ, मारहाण केली नाही’

News Desk

नवनीत राणांचा MRI करतानाचा फोटो व्हायरल झाल्यावरून शिवसेनेने लीलावती रुग्णालयाच्या प्रश्नाला विचारले ‘हे’ प्रश्न

Aprna