HW News Marathi
महाराष्ट्र

‘आमदार निलेश लंकेंनी अरेरावी, शिवीगाळ, मारहाण केली नाही’

अहमदनगर। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्याकडून ग्रामीण रुग्णालयाचे कनिष्ठ लिपिक राहुल दिलीप पाटील यांना मारहाण आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याची चर्चा सुरु होती. त्याबाबत पारनेर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांच्या सहीसह एक तक्रार अर्जही व्हायरल होत आहे. मात्र, याबाबत आपण कुठलिही तक्रार केली नसल्याचा खुलासा संबंधित लिपिकाने केलाय. तसंच आपल्याला आमदार निलेश लंके यांच्याकडून कुठल्याही प्रकारची अरेरावी, शिवीगाळ किंवा मारहाण झाली नसल्याचंही त्या लिपिकाने म्हटलं आहे.

अरेरावी, शिवीगाळ किंवा मारहाण केलेली नाही

निलेश लंकेंविषयी काहीतरी गैरसमज झाल्याचं सांगितलं जातंय. आमदार निलेश लंके यांनी मला कोणत्याही प्रकारची अरेरावी, शिवीगाळ किंवा मारहाण केलेली नाही. त्यांच्याविरोधात कोणताही तक्रार अर्ज केला नाही. आमदार साहेबांकडून मला मारहाण झाल्याची पोस्ट फिरत आहे. तसंच समाजमाध्यमातून आपली बदनामी होत असल्याचंही त्या लिपिकाने म्हटलंय. त्यामुळे आमदार लंके यांनी संबंधित लिपीकाला मारहाण केल्याची बातमी चुकीची असल्याचं आता सांगितलं जात आहे.

नेमकं काय घडलं?

लसीकरणाबाबत टोकन वाटपावेळी आमदार निलेश लंके आणि डॉ. कावरे यांनी कनिष्ठ लिपिक राहुल पाटील यांच्यावर टोकन वाटपात पैसे घेतल्याचा आरोप केला. तसंच या प्रकरणाची कुठलीही शाहनिशा न करता आमदार लंके यांनी त्यांना मारहाण केली. तसंच अन्य दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. ही घटना गटविकास अधिकारी आणि पारणेर पोलीस निरीक्षक बळप यांच्यासमोर घडल्याचंही बोललं जात आहे. याबाबत योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी पारनेर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी जिल्हा शल्य चिकित्सकाकडे पत्राद्वारे केली आहे.

आमदार लंके यांनी मला शिवीगाळ किंवा मारहाण केलेली नाही. सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या पोस्ट चुकीच्या आणि माझी बदनामी करणाऱ्या आहेत. याबाबत चुकीची आणि खोटी पोस्ट करणाऱ्यांविरुद्ध मी रीतसर तक्रार अर्ज पोलीस ठाण्यात केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रकाश मेहतांच्या समर्थकांनी केली पराग शहांच्या गाडीची तोडफोड

News Desk

“देशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान पाहिजे, जो सारखा म्हणेल आगे बढो, आगे बढो” – मुख्यमंत्री

News Desk

निलेश राणेंनी कंगणा रणावतला झापलं !

News Desk