HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्री थोड्याच वेळात संवाद साधणार, MPSC पूर्व परीक्षेसह लॉकडाऊनबाबतही निर्णय जाहीर करणार ?

मुंबई । राज्य सरकारने पुन्हा एकदा MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकल्याचा निर्णय आज (११ मार्च) जाहीर केला आहे. त्यामुळे, राज्य सरकारला राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले असून पुणे, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबादमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. राज्य सरकारकडून सलग पाचव्यांदा या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः MPSC परीक्षांच्या निर्णयाची घोषणा करणार आहे. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, रात्री 8.30 वाजता मुख्यमंत्री फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज ६७८ नवीन रुग्णांचे निदान, एकूण कोरोना बाधितांची संख्या १२ हजार ९७४ वर

News Desk

देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सलग दुसऱ्या दिवशी मोठी घट, कोरोनामुक्तांचे आकडे वाढले

News Desk

…त्यानंतरच आम्ही १०० युनिट वीज माफ करण्याचा निर्णय घेऊ ! ऊर्जामंत्र्यांचा निशाणा 

News Desk